Ind vs Ban ODI : पहिल्या सामन्यात पराभव रोहित शर्माच्या जिव्हारी, संघावर संतापला

| Updated on: Dec 04, 2022 | 9:59 PM

Ind vs Ban : टीम इंडियाला पहिल्या वनडे सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे, यावेळी कर्णधार रोहित शर्माने संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केलीये.

Ind vs Ban ODI : पहिल्या सामन्यात पराभव रोहित शर्माच्या जिव्हारी, संघावर संतापला
rohit sharma
Follow us on

Ind vs Ban ODI : भारतीय संघ ( Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून भारताला पहिल्या वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. भारतीय संघ फक्त 186 रन्सवर ऑलआऊट झाला. बांगलादेशकडून मेहेदी हसन मिराजने शानदार फलंदाजी करत संघासाठी विजय खेचून आणला. हा पराभव रोहित शर्माच्या चांगलाच जीव्हारी लागला असून त्याने संघाला चांगलंच सुनावलं आहे.

बांगलादेशच्या पिचवर भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. संघ कशी प्रकार सुधारणा करेल माहित नाही. अशा महत्त्वाच्या वेळी दबाव सहन करता आला पाहिजे.

187 रनचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचे 9 विकेट 136 रनवर पडले होते. पण दहाव्या विकेटसाठी मेहेदी हसन मिराज आणि मुस्ताफिजुर रहमान यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताकडून विजय खेचून आणला.

रोहित शर्माने म्हटलं की, आम्ही 40 ओव्हरपर्यंत चांगली गोलंदाजी केली. आमच्याकडे मोठी धावसंख्या नव्हती. जर आणखी 25 ते 30 रन असते. तर आम्हाला मदत झाली असती. एकापाठोपाठ एक विकेट गेल्याने मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

रोहित शर्माने पुढे म्हटलं की, बांगलादेशच्या पीचवर कशी फलंदाजी करावी हे आम्हाला शिकण्याची गरज आहे. पण आशा आहे खेळाडू शिकतील आणि सुधारणा होईल.