IND vs BAN: आज काही खेळाडू बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना होणार

| Updated on: Dec 01, 2022 | 3:54 PM

या कारणामुळे शिखर धवन-वाशिंगटन सुंदर शुक्रवारी बांगलादेशमध्ये दाखल होणार

IND vs BAN: आज काही खेळाडू बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना होणार
Team India
Follow us on

मुंबई : आज काही खेळाडू बांगलादेश (BAN) दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. टीम इंडियाचा (IND) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली यांच्यासोबत टीम इंडियातील खेळाडू बांगलादेशमधील ढाका येथे दाखल होणार आहे. न्यूझिलंड दौऱ्यात समाविष्ठ असलेले दोन खेळाडू मात्र शुक्रवारी बांगलादेशमध्ये दाखल होणार असल्याचे माहिती बीसीसीआयने जाहीर केली आहे. त्यामुळे शिखर धवन-वाशिंगटन सुंदर यांचा समावेश आहे.

टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तर दोन कसोटी खेळणार आहे. सध्याच्या टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

बांगलादेश विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ

हे सुद्धा वाचा

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर. कुलदीप सेन.

बांगलादेश विरुद्ध भारतीय कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव. .

भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय संघ

तमीम इक्बाल (कर्णधार), यासिर अली, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन, अफिफ हुसैन, महमुदुल्लाह, मेहंदी हसन मिराज, लिटन दास, अनामूल हक, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद हुसैन, इबाद, इबाद. नसूम अहमद