Bhuvneshwar Kumar: कमबॅक ठरला पूर्णपणे फेल, आता भुवनेश्वर कुमार म्हणाला, मी तर सध्या…

IND vs NZ 3rd T20 Match: भारत न्यूझीलंड यांच्यात तिसरा सामना काल रंगला जो भारतीय संघाने जिंकला. या सामन्यानंतर भुवनेश्वर कुमारने त्याच्या वनडे कमबॅकवर विधान केले .

Bhuvneshwar Kumar: कमबॅक ठरला पूर्णपणे फेल, आता भुवनेश्वर कुमार म्हणाला, मी तर सध्या...
| Updated on: Oct 28, 2026 | 3:27 PM

Bhuvneshwar Kumar Comeback: भारतीय संघात भुवनेश्वर कुमारचे कमबॅक व्हावे अशी अपेक्षा अनेक क्रिकेट दिग्गज व्यक्त करत होते. त्यानुसार गोष्टी घडल्यासुद्धा की भुवीचे भारतीय संघात पुनरागमन झाले. खरं तर न्यूझीलंडविरुद्ध टी-२०साठी भुवीचे कमबॅक करण्यात आले होते. पण वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या टी-२० सामन्यातच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. त्या सामन्यात त्याला खेळता आले नाही कारण पावसामुळे सामना रद्द झाला. आता भुवी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने खेळला आहे पण तिन्ही सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामना संपल्यानंतर भुवनेश्वर कुमारने त्याच्या कमबॅकवर एक विधान केले.

चार वर्षांनंतर भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केलेल्या भुवनेश्वर कुमारला मंगळवारच्या सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल विचारले असता, तो म्हणाला की, “मी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल फार दूरचा विचार करत नाहीये. पुन्हा भारतासाठी खेळायला मिळणे ही एक उत्तम गोष्ट आहे, पण मी भविष्याचा फारसा विचार करत नाहीये. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असो किंवा विजय हजारे ट्रॉफी, मी देशांतर्गत क्रिकेट खेळत राहीन.”

Loading...

भुवनेश्वर गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅट असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळला होता. भारतीय टी-२० संघात त्याच्या पुनरागमनामुळे त्याला पुढील वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या संघातही स्थान मिळवायचे असेल, म्हणूनच त्याने या वर्षीच्या ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

वेगवान गोलंदाजांना वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे निवड समिती भुवनेश्वरकडेही लक्ष ठेवून आहे. मात्र, तीन टी-२० सामन्यांमधील भुवनेश्वरची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याला कामगिरीसोबतच आपल्या तंदुरुस्तीवरही काम करावे लागेल. आता भुवीकडे दोन सामने आहेत ज्यात तो त्याची कामगिरी सुधरवू शकतो.  आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा टी-२० सामना शुक्रवारी रंगणार आहे. या सामन्यात तरी भुवनेश्वर कुमार कमबॅक करतो की नाही याकडे चाहत्यांचा नजरा लागून असतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us