
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील तीन सामन्यांची वनडे सीरीज रोमांचक वळणावर आहे. दोन्ही टीम्स मालिकेत 1-1 बरोबरीत आहेत. तिसरा सामना दोन्ही टीम्ससाठी निर्णायक असेल. शेवटचा सामना विशाखापट्टणमच्या डॉ. वाई.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. ही मॅच जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिकेची टीम 10 वर्षानंतर भारतात वनडे सीरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. विशाखापट्टणमच्या या मैदानाने नेहमीच भारताला साथ दिली आहे. इथे खेळल्या गेलेल्या 10 वनडे सामन्यांपैकी 7 मॅच भारताने जिंकल्या आहेत. फक्त 2 सामन्यात पराभव झालाय. एक मॅच टाय झाली आहे.
म्हणजे विजयाची टक्केवारी 70 टक्केच्यावर आहे. या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा वनडे सामना 2019 साली जिंकला होता. 2023 साली इथे ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून थोडी चिंता जरुर वाढवली होती. आता 2 वर्षानंतर टीम इंडिया इथे पुन्हा एकदा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा या मैदानातला रेकॉर्ड काय?
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला या मैदानात खेळण्याचा अनुभव नाहीय. ते अजूनपर्यंत इथे एकही वनडे सामना खेळलेले नाहीत. 2019 साली एक टेस्ट मॅच आणि 2022 साली एक टी 20 सामना खेळले होते. दोन्ही मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला. म्हणजे विशाखापट्टणच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा विजयाचा रेकॉर्ड शून्य आहे. अशावेळी दक्षिण आफ्रिकेला ही सीरीज जिंकण्यासाठी विशाखापट्टणमा इतिहास बदलावा लागेल. या मैदानावर विजयाचं खातं उघडावं लागेल.
दोन्ही टीमचा स्क्वाड :
टीम इंडिया : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड़, वॉशिंगटन सुंदर, केएल राहुल (विकेटकीपर कॅप्टन), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, तिलक वर्मा.
दक्षिण आफ्रीका: एडेन मार्करम, रयान रिकेल्टन, टेंबा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मॅथ्यू ब्रीट्जके, टोनी डी जोरजी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, प्रेनेलन सुब्रायन, नंद्रे बर्गर, ओटनील बार्टमॅन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रुबिन हरमन.