AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाही लग्नात कोट्यवधींचा खर्च; घटस्फोटानंतर हंसिका मोटवानीने किती मागितली पोटगी?

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीने पती सोहेल खटुरियाला कायदेशीररित्या घटस्फोट दिला आहे. वांद्रे फॅमिली कोर्टात या घटस्फोटाची औपचारिकता पूर्ण झाली आहे. हंसिकाने सोहेलकडे किती पोटगी मागितली, ते जाणून घ्या..

शाही लग्नात कोट्यवधींचा खर्च; घटस्फोटानंतर हंसिका मोटवानीने किती मागितली पोटगी?
हंसिका मोटवानी, सोहेल खटुरियाImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2026 | 9:21 AM
Share

अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिचा पती सोहेल खटुरिया यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून होत्या. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यानंतर आता हे दोघं कायदेशीररित्या विभक्त झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात हंसिका आणि सोहेल यांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर अखेर स्वाक्षरी केली आहे. परस्पर संमतीने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हंसिका आणि सोहेलने डिसेंबर 2022 मध्ये लग्न केलं होतं. गेल्या काही काळापासून त्यांच्यात मतभेद होते आणि ते सोडवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्नसुद्धा केले. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. अखेर एकमेकांच्या मनात कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा घटस्फोट घेतलेला बरा, असं दोघांनी ठरवलं.

जेव्हा एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीचा घटस्फोटो होतो, तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या पोटगीच्या बातम्या समोर येतात. परंतु हंसिका आणि सोहेल यांचा खटला इतर प्रकरणांपेक्षा खूप वेगळा आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार आणि प्रतिज्ञापत्रांनुसार, हंसिका किंवा सोहेलने पोटगीसाठी किंवा नुकसान भरपाईसाठी कोणताही दावा किंवा मागणी केलेली नाही. सोहेलकडून पोटगी नको असल्याचं हंसिकाने कोर्टात स्पष्ट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Hansika Motwanni (@ihansika)

हंसिकाचं प्रतिनिधित्व करणारे वकील अदनान शेख म्हणाले, “लग्नानंतर हे जोडपं काही दिवस एकत्र राहिले, परंतु हळूहळू त्यांना जाणवलं की त्यांच्या स्वभावात, विचारांमध्ये आणि लाइफस्टाइलमध्ये मोठा फरक आहे. त्यातून त्यांच्यात छोट्या छोट्या कारणांवरून वाद होऊ लागले. क्षुल्लक गोष्टींवरून हंसिका आणि सोहेल यांच्यात भांडणं व्हायची. यामुळे एकाच छताखाली एकत्र राहणं अधिकाधिक कठीण होत चाललं होतं. म्हणून त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.”

हंसिका मोटवानी आणि सोहेल खटुरिया यांचं लग्न 2022 मधील सर्वांत चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होतं. 4 डिसेंबर 2022 रोजी जयपूरमधील 450 वर्षे जुन्या मुंडोटा किल्ला आणि राजवाड्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. या राजवाड्यातील प्रीमियम सुइट्सची किंमत एका रात्रीसाठी 60 हजार रुपयांपर्यंत होती. हंसिका आणि सोहेलने तीन दिवसांसाठी इथे बुकिंग गेली होती. या संपूर्ण लग्नाचा खर्च सुमारे 20 कोटी रुपये इतका होता. या लग्नाचं थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्यात आलं होतं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा