IND A vs NZ A : इंडिया ए चे वाघ पेटून उठले, न्यूझीलंडवर जबरदस्त पलटवार, लढण्याची जिद्द निर्माण होईल असे कसोटीतील तिसऱ्या दिवशीचे आकडे

IND A vs NZ A : इंडिया ए आणि न्यूझीलंड ए मध्ये टेस्ट मॅच सुरु आहे. आगामी टेस्ट सीरीजच्या दृष्टीने ही टेस्ट मॅच महत्वाची आहे. दुसऱ्या डावात इंडिया ए च्या फलंदाजांनी जी करामत केलीय, त्याला तोड नाही. जबरदस्त पलटवार केलाय.

IND A vs NZ A : इंडिया ए चे वाघ पेटून उठले, न्यूझीलंडवर जबरदस्त पलटवार, लढण्याची जिद्द निर्माण होईल असे कसोटीतील तिसऱ्या दिवशीचे आकडे
IND A vs NZ A
| Updated on: Oct 26, 2026 | 2:12 PM

इंडिया ए ने न्यूझीलंड ए वर जबरदस्त पलटवार केला आहे. सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. सिनियर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध पाच टी20 सामन्यांची सीरीज खेळत आहे. त्याचवेळी इंडिया ए चा न्यूझीलंड ए विरुद्ध अनऔपचारिक कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेच्या दृष्टीने तयारीची चाचपणी करण्यासाठी ही अनऔपचारिक कसोटी सामना महत्वाचा आहे. शनिवारी ही टेस्ट मॅच सुरु झाली. पहिल्या दिवशी इंडिया ए डाव 113 धावांवर आटोपला होता. एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नव्हता. फक्त यश राठोडने नाबाद 44 आणि देवदत्त पडिक्कलने 32 धावा केल्या होत्या.

त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 317 धावा केल्या. न्यूझीलंड ए कडे 204 धावांची आघाडी होती. पहिल्या डावातील टीम इंडियाची कामगिरी पाहून असं वाटलेलं की, इंडिया ए ची टीम सहज गुडघे टेकेल. पण असं झालं नाही. दुसऱ्या डावात इंडिया ए ने जबरदस्त कमबॅक केलं. याचं सर्व श्रेय जात देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन आणि यश राठोड यांना. देवदत्तची डबल सेंच्युरी अवघ्या एक रन्सने हुकली. त्याने 248 चेंडूत 199 धावा फटकावल्या. यात 24 फोर आणि 3 सिक्स होते. साई सुदर्शनने 184 चेंडूत 91 धावा केल्या. त्याने 12 चौकार मारले. यश राठोडने 66 धावा केल्या.

Loading...

इंडिया ए ने सर्वांचीच तोंडं बंद केली

त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 51 धावांवर नाबाद आहे. अंशुल कंबोजने 23 धावा आणि अकील नबीने 38 धावा केल्या. इंडिया ए च्या 8 बाद 488 धावा झाल्या आहेत. अजून दोन विकेट बाकी आहेत. कसोटीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. सध्या इंडिया ए कडे 284 धावांची आघाडी आहे. ही आघाडी वाढवण्याची संधी आहे. इंडिया ए ने न्यूझीलंड ए समोर चांगली फायटिंग टोटल ठेवली आहे. एक आव्हान निर्माण केलं आहे. टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. पहिल्या डावातील अवस्था पाहून इंडिया ए तीन दिवस तरी टिकाव धरेल का असा प्रश्न निर्माण झालेला. पण इंडिया ए ने सर्वांचीच तोंडं बंद केली आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us