AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs ENG: पाक 20 धावांनी हरला, पण नंतर एक निर्णय अन् थेट इंग्लंडकडून जिंकलेला सामना हिसकावून घेतला

PAK vs ENG ODI Match: भारत पाकिस्तान यांच्यात वनडे सामना रंगला जो पाकिस्तानने जिंकला. आता या सामन्यात पाकिस्तानने कशी शेवटच्या क्षणी बाजी पलटवली ते पाहा...

PAK vs ENG: पाक 20 धावांनी हरला, पण नंतर एक निर्णय अन् थेट इंग्लंडकडून जिंकलेला सामना हिसकावून घेतला
| Updated on: Oct 26, 2026 | 1:58 PM
Share

PAK vs ENG ODI Match: लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर एका क्षणासाठी असे वाटले की पाकिस्तान सामना हरला आहे. इंग्लंडचे खेळाडू जल्लोष करू लागले, हस्तांदोलनं होऊ लागली आणि शादाब खान स्पष्टपणे निराश दिसत होता. पण एका रिव्ह्यूने सर्व काही बदलून टाकले. यजमान पाकिस्तानने त्यानंतर एकदिवसीय तिरंगी मालिकेत एका विकेटने दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

या नाट्यमय घडामोडींना ४५ व्या षटकात सुरुवात झाली, जेव्हा गस ऍटकिन्सनचा चेंडू शादाबच्या पॅडला लागला. गोलंदाजाने अपील केले आणि पंचांनी बोट वर केले. शादाबने तो निर्णय स्वीकारला आणि पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. इंग्लंडचे खेळाडू जल्लोष करू लागले. काहींनी हस्तांदोलनही केले आणि टीव्हीवर काही क्षणांसाठी इंग्लंड २० धावांनी जिंकल्याचे दिसले.

शादाब स्पष्टपणे अस्वस्थ झाला होता. त्याने आपली बॅट जमिनीवर आपटली आणि तो गुडघ्यावर बसला. जो रूट आणि हॅरी ब्रूक त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आले, तर इतर इंग्लिश खेळाडू जल्लोषात मग्न होते. पण मग शादाबने शेवटच्या क्षणी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. रिप्लेने सर्व काही बदलून टाकले. अल्ट्राएजने दाखवून दिले की चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला चाटून गेला होता. हा निर्णय बदलण्यात आला आणि स्टेडियममधील प्रेक्षक आनंदाने जल्लोष करू लागले.

शदाबला सामना पूर्ण करण्याची आणखी एक संधी देण्यात आली, तर इंग्लंडचे खेळाडू थक्क झाले होते. पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आणि सामना पुन्हा सुरू झाला. स्पर्धेतील आपला पहिलाच सामना खेळताना, शदाबने या संधीचे सोने केले. त्याने ९६ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ११३ धावा केल्या. रौफने १९ चेंडूंमध्ये नाबाद ७ धावा केल्या. या दोघांनी १०व्या विकेटसाठी विक्रमी ८९ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला १ गडी राखून विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पाकिस्तानसमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवले, जे त्यांनी १७ चेंडू शिल्लक असताना ९ गडी गमावून पूर्ण केले. या विजयामुळे पाकिस्तानने त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले.

Follow Us
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?