#IndvsAus : आज हरलात तर 10 वर्षांच्या मेहनतीवर पाणी!

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी ट्वेण्टी सामना आज मेलबर्नमध्ये खेळवण्यात येत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 4 धावांनी निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. जर ऑस्ट्रेलियाने आज पुन्हा भारताला पराभूत केलं, तर टी 20 …

#IndvsAus : आज हरलात तर 10 वर्षांच्या मेहनतीवर पाणी!

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी ट्वेण्टी सामना आज मेलबर्नमध्ये खेळवण्यात येत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 4 धावांनी निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. जर ऑस्ट्रेलियाने आज पुन्हा भारताला पराभूत केलं, तर टी 20 फॉरमॅटमध्ये 10 वर्षांनी ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध मालिका जिंकू शकेल.

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध शेवटचा टी ट्वेण्टी सामना 1 फेब्रुवारी 2008 रोजी जिंकला होता. त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान चार टी 20 मालिका झाल्या. मात्र या सर्व मालिका भारतानेच जिंकल्या. भारतीय संघाने गेल्या 9 मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने गेल्या वर्षी जुलै 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची टी 20 मालिका गमावली होती. त्यानंतर भारताने नऊ मालिका खेळल्या, त्यापैकी 8 जिंकल्या तर एक ड्रॉ राहिली.

दरम्यान, पहिला टी 20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमाने हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 17 षटकात 4 बाद 154 धावा केल्या होत्या. मात्र डकवर्थ लुईस नियमाने भारतासमोर 17 षटकात 174 धावांचं आव्हान होतं. पण भारताला 170 धावाच करता आल्या होत्या. भारताच्या शिखर धवनने पहिल्या सामन्यात 42 चेंडूत तुफानी   76 धावा केल्या. मात्र अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता न आल्याने भारताला विजयी लक्ष्य गाठता आलं नाही.

मेलबर्नमध्ये भारत जिंकणार?

भारताने मेलबर्नमध्ये तीन टी 20 सामने खेळले आहेत. त्यापैकी मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. त्या सामन्यांमध्ये भारताने टॉस हरला होता, पण मॅच जिंकली होती. मात्र 2008 मध्ये टॉस जिंकला होता मात्र तो सामना भारताने गमावला होता.

उमेश-चहलला संधी मिळणार?

दरम्यान, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल केले जाऊ शकतात. खलील अहमद आणि कृणाल पंड्याऐवजी उमेश यादव आणि यजुवेंद्र चहल यांना संधी मिळू शकते.

 के एल राहुलचा ढासळता फॉर्म

लोकेश राहुलचा खराब फॉर्म भारतीय फलंदाजीची डोकेदुखी ठरत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी 20 सामन्यात 101 धावा ठोकणाऱ्या राहुलने त्यानंतरच्या सहा सामन्यात 30 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. राहुल तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला येतो, त्यामुळे विराट कोहलीला चौथ्या क्रमांवर फलंदाजीसाठी उतरावं लागतं. आजच्या सामन्यात फलंदाजी क्रमवारीत बदल होऊ शकतो.

 भारतीय संघ:  रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार),  केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर),  दिनेश कार्तिक, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह,  खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, उमेश यादव

ऑस्ट्रेलिया:  अरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, क्रिस लिन,  ग्लेन मॅक्सवेल,  मार्कस स्टोइनिस,  बेन मॅकडरमॉट,  एलेक्स केरी (विकेटकीपर),  नाथन कूल्टर नाइल, अँड्रयू टाईय, जेसन बेहरेनडोर्फ, बिली स्टेनलेक

21, 23 आणि 25 नोव्हेंबरला टी ट्वेण्टी सामने, तर 6 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या 

धवनकडून सासरवाडीत यजमानांची धुलाई, तरीही भारताचा पराभव  

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *