IND vs NZ ODI मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका, मॅचविनरला बाहेर बसावं लागणार

IND vs NZ Match: भारत न्यूझीलंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु असताना भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे.

IND vs NZ ODI मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका, मॅचविनरला बाहेर बसावं लागणार
| Updated on: Oct 29, 2026 | 7:50 AM

IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून या मालिकेतील तीन सामने आधीच पार पडले आहेत. तीन सामने भारतीय संघाने जिंकले असून मालिकेत भारतीय संघ आघाडीवर आहे. आता मालिका सुरु असताना भारतीय संघाला मोठा झटका मिळाला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार नाही. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. बीसीसीआयच्या एका सूत्राने बुधवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

प्रसिद्ध कृष्णाला मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान ही दुखापत झाली होती. तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. १ आणि २ नोव्हेंबर रोजी बंगळूरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) त्याच्या मॅच सिम्युलेशन आणि फिटनेस चाचण्या होणार आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले, “प्रसिद्ध बरा होत आहे. त्याच्या मॅच सिम्युलेशन आणि फिटनेस चाचण्या १ आणि २ नोव्हेंबर रोजी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये होणार आहेत.”

Loading...

सूत्राच्या मते, संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समितीचा असा विश्वास आहे की प्रसिद्धने एकदिवसीय सामन्यांऐवजी कसोटी क्रिकेटसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण कसोटी क्रिकेटमध्ये त्याची अधिक गरज आहे. जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला प्रसिद्ध कृष्णाच्या जागी भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळू शकते. लिंकन येथे भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील पहिल्या अनधिकृत लाल चेंडूच्या सामन्यात आकिबने आपल्या कामगिरीने प्रभावित केले. निवड समिती प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकिब नबीचा संघात समावेश करते की दुसऱ्या पर्यायाचा विचार करते, हे पाहणे बाकी आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावरील पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव

न्यूझीलंड दौऱ्यावरील शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us