Shreyanka Patil : शॉर्ट स्कर्टवर डान्स केला म्हणून ट्रोल, आता श्रेयंका पाटीलनं पोस्ट केला नवा व्हिडीओ; ‘बबली बदमाश’नंतर…

भारतीय महिला क्रिकेटपटू श्रेयंका पाटील डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी डान्स करतानाचे रिल तिने शेअर केले होते. त्यानंतर ती ट्रोल झाली होती. पण या ट्रोलिंगवर श्रेयंका पाटीलने मू्ँह तोड जवाब दिला आहे.

Shreyanka Patil : शॉर्ट स्कर्टवर डान्स केला म्हणून ट्रोल, आता श्रेयंका पाटीलनं पोस्ट केला नवा व्हिडीओ; बबली बदमाशनंतर...
sheyanka patil viral video
| Updated on: Nov 01, 2026 | 5:20 PM

क्रिकेटपटू म्हटल्यावर तिच्या चौकार- षटकार आणि विकेट्सची चर्चा होतेच. पण आता भारतीय महिला क्रिकेटपटू श्रेयंका पाटील क्रिकेटमुळे नव्हे तर तिच्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी एका गाण्यावर डान्स करतानाचे रिल तिने शेअर केले होते. त्यानंतर ती ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली होती. पण या ट्रोलिंगवर श्रेयंका पाटीलने पुन्हा एक नवा व्हिडिओ शेअर करत मू्ँह तोड जवाब दिला आहे.

या रिलवरून झाली होती टिका

श्रेयंका पाटीलने काही दिवसांपूर्वी 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शूटआउट अॅट वडाळा’ या चित्रपटातील ‘बबली बदमाश है’ या गाण्यावर ल डान्स करत रिल पोस्ट केली होती. तिचा डान्स पाहून हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आला. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या तर काही जणांनी तिच्या या व्हिडिओवर टीका करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

Loading...

पण श्रेयंका पाटीलने या ट्रोलिंगकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. त्यावर उत्तर म्हणून तिने आता आणखी एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी तिने ट्रोलर्सला मूँह तोड जवाब दिला आहे. ‘गोलियो की रासलीला राम -लीला’ या चित्रपटातील ‘दिल की ये गोली चली, नैनो की बंदूक से’ या गाण्यावर रिल केला आहे. तिच्या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष पुन्हा वेधून घेतले आहे.

 

 

 

मैदानातही श्रेयंकाची दमदार कामगिरी

फक्त सोशल मीडियावरच नाही, तर क्रिकेटच्या मैदानावरही श्रेयंकाने जोरदार पुनरागमन केलं आहे. मागील काही काळापासून ती दुखापतींशी झुंज देत होती. त्यामुळे यंदाच्या महिला T-20 विश्वचषकातही तिला खेळता आलं नव्हतं.

मात्र आता तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. वरिष्ठ महिला T-20 स्पर्धेत कर्नाटकाकडून खेळताना महाराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात तिने तब्बल 5 विकेट्स घेतल्या. तिच्या या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आणि सामनावीर ही पटकावला.

ट्रोलिंगबद्दल श्रेयंकांच स्पष्ट मत

आज तकच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत श्रेयंकाने ट्रोलिंगबद्दल आपलं मत मांडलं होतं. ती म्हणाली लोक आपल्याकडे लक्ष देत आहेत. हेच आपल्यासाठी चांगलं असल्याचं ती म्हणाली होती. लोकांनी टीका केली, ट्रोल केलं किंवा कौतुक केलं, तरी तिला त्याचा फारसा फरक पडत नाही. कारण तिला जे आवडतं तेच ती करते असंही तिने स्पष्ट केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us