Udaipur Murder: ‘हा माझा हिंदुस्तान आहे, इथे हिंदुंचा जीव महत्त्वाचा’, उदयपूर घटनेवर बबीता फोगाटचं टि्वट

Udaipur Murder: राजस्थान उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडाने (Udaipur Kanhaiya Lal Murder) सर्वांनाच हादरवून सोडलय. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या घटनेचा निषेध केलाय.

Udaipur Murder: 'हा माझा हिंदुस्तान आहे, इथे हिंदुंचा जीव महत्त्वाचा', उदयपूर घटनेवर बबीता फोगाटचं टि्वट
babita phogat
Image Credit source: twitter
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 30, 2022 | 1:39 PM

मुंबई: राजस्थान उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडाने (Udaipur Kanhaiya Lal Murder) सर्वांनाच हादरवून सोडलय. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या घटनेचा निषेध केलाय. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठान (Irfan pathan) नंतर आता महिला कुस्तीपटू बबिता फोगाटने (Babita Fogat) यावर भाष्य केलं आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये बबिताने सुवर्णपदक मिळवलं होतं. सोशल मीडियावर सुरु असलेल्या ‘हिंदू लाइव्स मॅटर’ अभियानातंर्गत तिने हे टि्वट केलय. माझ्या हिंदुस्तानात हिंदुंचा जीव महत्त्वाचा आहे, असं बबिताने म्हटलं आहे. काल इरफान पठाननेही टि्वट केलं होतं. “तुम्ही कशावर विश्वास ठेवता, याने फरक पडत नाही. कुठल्याही निर्दोष व्यक्तीला दुखावण हे संपूर्ण मानवतेला दुखावण्यासारख आहे” असं इरफान पठानने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.

बबिता फोगाटने काय म्हटलय?

बबिता फोगाट भाजपामध्ये आहे. ‘हा माझा हिंदुस्तान आहे! इथे हिंदुंचा जीव महत्त्वाचा आहे’ #HinduLivesMatters हा हॅशटॅगही तिने सोबत टि्वटमध्ये जोडला आहे. बबिता फोगाटने भारतासाठी पदक विजेती कामगिरी केली आहे. 2014 कॉमन वेल्थ स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याआधी 2010 आणि 2018 मध्ये तिने रौप्यपदक विजेती कामगिरी केली आहे. 2012 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिने कांस्य पदक मिळवलं होतं.

वेंकटेश प्रसाद काय म्हणाला?

“उदयपूरमधली घटना खूपच दु:खद आहे. या कठीण काळात मी सर्वांना शांतता आणि संयम राखण्याच आवाहन करतो. कायद्याने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे” असं वेंकटेश प्रसादने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

उदयपूर हत्याकांडाचं कारण काय?

कन्हैया लालच्या 8 वर्षाच्या मुलाने सोशल मीडियावर नुपूर शर्माच्या समर्थनाची पोस्ट केली होती. त्यामुळे काही लोक नाराज झाले होते. त्यांनी धारदार शस्त्रांनी त्या आठ वर्षाच्या मुलाचे पिता कन्हैया लाल यांची निर्घृण हत्या केली.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें