घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही, बबिता फोगाटचा इशारा, तब्लिगींवरील ट्विटने वाद

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती पैलवान बबिता फोगट (Babita Phogat tweet on tablighi jamaat) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही, बबिता फोगाटचा इशारा, तब्लिगींवरील ट्विटने वाद

मुंबई : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती पैलवान बबिता फोगट (Babita Phogat tweet on tablighi jamaat) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बबिताने कोरोनावरुन तब्लिगींबाबत (Babita Phogat tweet on tablighi jamaat) केलेल्या ट्विटवरुन सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक भिडले आहेत. या वादानंतर बबिताचं अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी होत असताना, आता बबिताने व्हिडीओ संदेश जारी करुन, विरोधकांना इशारा दिला.
“माझ्या ट्विटनंतर गेल्या काही दिवसांपासून मला धमक्या येत आहेत. मात्र मी घाबरुन घरी बसायला झायरा वसीम नाही, असा इशारा बबिताने या व्हिडीओतून दिला.

बबिता फोगाटने देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी तब्लिगी जमातचे लोक कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे तब्लिगी जमातचे असल्याचा दावाही तिने केला होता. जर तब्लिगींनी कोरोना व्हायरस पसरवला नसता तर आतापर्यंत लॉकडाऊन संपला असता, असं बबिता म्हणाली होती.

बबिता फोगाटने विरोधकांना उत्तर देणारा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर, बहीण गीता फोगाटनेही तिच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं.

बबिता फोगाटच्या आधीच्या ट्विटवरुन वाद
देशात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता, बबिता फोगाटने 15 एप्रिलला एक ट्विट केलं होतं. यामध्ये तिने देशात कोरोना संसर्ग वाढण्यासाठी तब्लिगी जमातच्या लोकांना जबाबदार धरलं होतं. बबिताने हे ट्विट केल्यानंतर पुन्हा रिट्विटही केलं होतं.

सोशल मीडियावर वॉर
बबिता फोगाटच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक भिडले आहेत. बबिताचं अकाऊंट सस्पेंड करा असं म्हणत #SuspendBabitaPhogat हा हॅशटॅग सुरु केला आहे. तर दुसरीकडे तिच्या समर्थकांनी #ISupportBabitaPhogat हा हॅशटॅगही ट्रेंड केला आहे. ट्विटरवर हे दोन्ही हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *