IPL 2020 : ‘या’ कारणांमुळे Rajasthan Royals ची पिछेहाट; कर्णधार स्मिथचं स्पष्टीकरण

| Updated on: Oct 08, 2020 | 8:13 AM

IPL 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सने शानदार सुरुवात केली होती. परंतु मागील तीन सामने गमावल्यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत तळाला गेला आहे.

IPL 2020 : या कारणांमुळे Rajasthan Royals ची पिछेहाट; कर्णधार स्मिथचं स्पष्टीकरण
Follow us on

दुबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने शानदार सुरुवात केली होती. सुरुवातीचे दोन सामने जिंकून राजस्थानच्या संघाने त्यांचा रॉयल परफॉर्मन्स दाखवला होता. परंतु त्यानंतर लागोपाठ तीन सामने गमावल्यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत तळाला गेला आहे. (IPL 2020 – Rajasthan Royals captain Steve Smith speaks on players performance)

मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यात राजस्थानचा 57 धावांनी दारुण पराभव झाला. याबाबत बोलताना राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला की, “आमचे खेळाडू फॉर्ममध्ये परत येतील आणि आम्ही सामने जिंकू असा मला विश्वास आहे”.

राजस्थानने मागील तीन सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारला आहे. तर स्पर्धेच्या सुरुवातीला राजस्थानने एम. एस. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि लोकेश राहुलच्या किंग्स इलेव्हन पंजाबला धूळ चारली होती.

राजस्थान रॉयल्स संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांचं अपयश हे आमच्या पराभावांमागचं मुख्य कारण असल्याले स्टीव्ह स्मिथने सांगितले. त्यातही विशेष म्हणजे राजस्थानचा प्रमुख फलंदाज रॉबिन उथप्पा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. उथप्पा लवकरच फॉर्ममध्ये परतेल, असेही स्मिथला वाटते.

टीव्ही 9 शी बोलताना स्मिथ म्हणाला की, “उथप्पा फॉर्ममध्ये परतण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. सध्याच्या परिस्थितीत त्याला आणि इतर अनेक खेळाडूंना अडचणी येत आहेत. त्यातही प्रामुख्याने जे खेळाडू तब्बल सहा महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलेत, त्यांना जास्त अडचणी येत आहेत. माझ्या संघातील सर्व खेळाडू त्यांच्या फॉर्ममध्ये लवकरच परततील, असा मला विश्वास आहे. कारण त्यासाठी आमचे सर्व खेळाडू खूप मेहनत घेत आहेत”.

नेट रनरेटवर लक्ष केंद्रित करावं लागणार

स्मिथ म्हणाला की, आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कोणताही संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार सिद्ध झालेला नाही. त्यातही प्रामुख्याने तिसऱ्या-चौथ्या स्थानावर सर्वच संघांमध्ये घमासान होणार आहे. त्यामुळे सर्व संघांना त्यांच्या नेट रनरेटवर लक्ष केंद्रित करावं लागेल. स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यांमध्ये त्याची आवश्यकता भासणार आहे.

टॉप ऑर्डरच्या अपयशामुळे मुंबईविरुद्धचा सामना गमावला : जोस बटलर

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दारुण पराभवानंतर राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर म्हणाला की, “आम्ही सुरुवातीलाच विकेट गमावल्या होत्या. परंतु मुंबईने गोलंदाजीदेखील उत्तम केली. त्यांच्या गोलंदाजांनी आमच्या फलंदाजांना सावरण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीलाच विकेट गमावल्यामुळे आमचे फलंदाज दबावाखाली होते. आमचे सुरुवातीचे फलंदाज मुंबईच्या माऱ्यासमोर टिकू शकले नाहीत”.

बटलरने स्वतःच्या संघातील सुरुवातीच्या फलंदाजांवर पराभवाचे खापर फोडले, त्याचप्रमाणे मुंबईच्या फंलदाजीचं कौतुकही केलं. बटलर म्हणाला की, सूर्यकुमार यादवने खूप चांगली खेळी केली. आमचा संघ त्याला रोखण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमारने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. तो एक जबरदस्त फलंदाज आहे. आमची कोणतीही रणनीती त्याच्यासमोर चालली नाही. या सामन्याचे संपूर्ण श्रेय त्यालाच जातं.

संबंधित बातम्या

IPL 2020, CSK vs KKR : गोलीकीपर प्रमाणं झेपावत धोनीनं घेतला कॅच, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

चमत्कार की थट्टा? 11 फलंदाजांचं द्विशतक, एकाच गोलंदाजाला 11 विकेट

(IPL 2020 – Rajasthan Royals captain Steve Smith speaks on players performance)