IPL 2021 : के एल राहुल रुग्णालयात, पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटाचं ट्विट, म्हणते, ‘राहुल तुला….’

| Updated on: May 03, 2021 | 12:06 PM

राहुलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंजाब संघाची मालकीण असलेल्या अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) ट्विट करुन त्याला लवकर बरं वाटावं, अशा मनोकामना व्यक्त केल्या. (IPL 2021 Punjab Kings owner Preity Zinta Tweet After KL Rahul Hospitalized)

IPL 2021 : के एल राहुल रुग्णालयात, पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटाचं ट्विट, म्हणते, राहुल तुला....
पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटाने के एल राहुलला बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत...
Follow us on

मुंबई : ऐन आयपीएलची (IPL 2021) धामधूम सुरु असताना रविवारी पंजाब किंग्जसाठी (Punjab Kings) वाईट बातमी आली. पंजाबचा कॅप्टन के. एल. राहुल (KL Rahul) याला पोटात दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. के. एल. राहुल याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरित सामन्यांमध्ये के. एल. राहुल पंजाबसाठी खेळू शकेल की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राहुलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंजाब संघाची मालकीण असलेल्या अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) ट्विट करुन त्याला लवकर बरं वाटावं, अशा मनोकामना व्यक्त केल्या. (IPL 2021 Punjab Kings owner Preity Zinta Tweet After KL Rahul Hospitalized)

के एल राहुलला वेदना अनावर

शनिवारी रात्री के.एल. राहुलच्या पोटात वेदना सुरु झाल्या होत्या. प्राथमिक वैद्यकीय उपचार करुनही वेदना थांबत नव्हत्या. यानंतर तातडीनं पुढील तपासणी केली असता त्याला अ‌ॅपेंडिक्स असल्याचं समोर आलं. सुरक्षेच्या दृष्टीनं केल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता राहुलवर शस्त्रक्रिया होणार आहे. मुंबईच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर पुढील शस्त्रक्रिया होणार आहे.

प्रीती झिंटाने ट्विटमध्ये काय म्हटलंय…?

के एल राहुलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंजाबची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटाने ट्विट केलं. या ट्विटमध्ये तिने के एल राहुलचा फोटो शेअर करत त्याला लवकर बरं वाटावं, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. के.एल. राहुल लवकरात लवकर बरा व्हावा, त्याला आराम मिळावा म्हणून मी त्याला शुभेच्छा पाठवत आहे, असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

के.एल. राहुलच्या सर्वाधिक धावा

आयपीएलच्या 14 व्या हंगामात राहुलनं सर्वाधिक 331 धावा केल्या आहेत. त्यानं सात मॅचेसमध्ये 66.20 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. राहुलच्या जागेवर कर्णधार म्हणून मयांक अग्रवालकडे पंजाबने जबाबदारी दिली आहे.

केएल राहुलची अनुपस्थिती, पंजाबला मोठा धक्का

केएल राहुल खेळत नसणं हा पंजाब संघासाठी मोठा धक्का आहे. स्पर्धा ऐन जोमात आलेली असताना तसंच सध्या पंजाबसाठी निर्णायक वळण आलेलं असताना के एल राहुल संघात नसणं ही पंजाब फ्रँचायजीसाठी मोठा धक्का आहे. सध्या राहुल तुफान फॉर्मात होता. त्याच्या बॅटमधून धावा निघत होत्या. मात्र दुर्दैवाने त्याला पोटदुखीमुळे रुग्णालयातदाखल करावं लागलं आहे.

(IPL 2021 Punjab Kings owner Preity Zinta Tweet After KL Rahul Hospitalized)

हे ही वाचा :