IPL 2024 RCB vs KKR Live Streaming: बंगळुरुसमोर कोलकाताचं आव्हान, सामना कधी?

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Live Streaming : शुक्रवारी 29 मार्च रोजी बंगळुरु विरुद्ध कोलकाता असा सामना होणार आहे. बंगळुरुसमोर कोलकाताच्या रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल या दोघांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

IPL 2024 RCB vs KKR Live Streaming: बंगळुरुसमोर कोलकाताचं आव्हान, सामना कधी?
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 11:05 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. उभयसंघातील सामना हा या मोसमातील दुसऱ्या फेरीतील अखेरचा सामना असणार आहे. आरसीबीने याआधीच 2 सामने खेळले आहेत. तर कोलकाताचा हा दुसरा सामना असेल. आरसीबीने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर दुसऱ्या बाजूला केकेआरने पहिलाच सामना जिंकून विजयी सुरुवात केली. त्यामुळे केकेआरचा बंगळुरु विरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर आरसीबीही सलग दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? याबाबत सर्वकाही जाणून घेऊयात.

बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना केव्हा?

बंगळुरु विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामना हा शुक्रवारी 29 मार्च रोजी होणार आहे.

बंगळुरु विरुद्ध कोलकाता कुठे?

बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे.

बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामन्याला नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर कुठे दिसणार?

बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

बंगळुरु विरुद्ध कोलकाता मॅच मोबाईलवर कुठे बघता येणार?

बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा, मनीष पांडे, वैभव अरोरा, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसेन, अनुकुल रॉय, श्रीकर भारत आणि दुष्मंथा चमीरा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, महिपाल लोमरोड, सुयश प्रभू , कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग, लॉकी फर्ग्युसन, विल जॅक्स, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा, टॉम करन आणि रीस टोपले.

Non Stop LIVE Update
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.