Vaibhav Sooryavanshi : IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीचं ताकदीचं गुपित अखेर उघड ! आवडते खास पिवळी मिठाई..
Vaibhav Sooryavanshi favourite food : इंडियन प्रीमिअर लीग 2026 मध्ये शानदार खेळीने सीझन गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. वैभवने संपूर्ण हंगामात 776 धावा केल्या. एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. वैभवला इतके लांब षटकार मारण्याची ताकद अखेर येते कुठून, असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल.

अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीग मध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीने खळबळ उडवून दिली. सचिन तेंडुलकरपासून ते सुनील गावसकर यांच्यापर्यंत अनेकजण वैभवचे चाहते बनलेत. इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे नामवंत गोलंदाजांची धुलाई केली, ते पाहून सर्वजण थक्क झालेत. त्याच्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. ज्या वयात लहान मुले खांद्यावर शाळेची दप्तरे घेऊन फिरतात, त्या वयात वैभवला एवढी दमदार बॅटिंग, शानदार फटेकबाजी करण्याची ऊर्जा कुठून मिळते, हे सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. या 15 वर्षांच्या ‘बेबी बॉस’च्या ऊर्जेमागे रहस्य काय ? ते समोर आलंय.
विशेष गोष्ट म्हणजे वैभव सूर्यवंशीला जेवढी बॅटिंग आवडते, तितकीच त्याला खाण्याचीही आवड आहे. त्याला विशेषतः मांसाहारी पदार्थ आवडतात. एका मुलाखतीत वैभवने सांगितलं हतं की त्याला मटण खूप आवडतं. एवढंच नव्हे तर त्याला चिकन आणि माशांचे विविध पदार्थही आवडतात. हेच त्याच्या ताकदीचं रहस्या म्हणावं लागेल. मांसाहारी पदार्थांव्यतिरिक्त वैभवला विविध गोड पदार्थ खायलाही खूप आवडतात. त्याचा सर्वात आवडता गोड पदार्थ म्हणजे (पिवळा) राजभोग. जर त्याला राजभोग खायला दिला, तर तो स्वत:ला ते खाण्यापासून रोखूच शकत नाही, अशीही माहिती उघड झाली.
आयपीएल 2026मध्ये सर्वाधिक धावा
यंदाचा आयपीएल सीझन पूर्णपणे वैभव सूर्यवंशीच्याच नावाने गाजला. जरी त्याचा संघ, राजस्थान रॉयल्स, दुर्दैवाने अंतिम फेरीत पोहोचू शकला नसला तरी वैभवची कामगिरी खूप प्रभावी होती. त्याने संपूर्ण हंगामात राजस्थानसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने आयपीएल 2026 च्या 16 सामन्यांमध्ये 776 धावा फटकावल्या, ज्यामुळे तो ऑरेंज कॅपचाही मानकरी ठरला. या सीझनमध्ये वैभवने एक शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली. प्लेऑफमध्ये तो दोनदा शतक करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण दुर्दैवाने आऊट झाला.
सीझनमधील सर्वाधिक सिक्सही वैभवच्या नावे
आयपीएल 2026 मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासोबतच, वैभवने या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. त्याने या हंगामात एकूण 72 षटकार मारून वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकलं. आयपीएल 2026 मध्ये षटकारांच्या बाबतीत वैभवच्या जवळपास कोणीही नाही. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल 33 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.