AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalit Modi : ती स्वत:च पैसे द्यायची, मी ठेवलेल्या..ललित मोदीने सुष्मिता सेन सोबतच्या रिलेशनशिपमधलं सत्य सांगितलं

Lalit Modi : काही वर्षांपूर्वी ललित मोदी आणि सुष्मिता सेनचे फोटो समोर आले होते. आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी देशाबाहेर पळून गेला आहे. त्याची आणि सुष्मिता सेनची भेट कशी झाली? दोघांमध्ये रोमान्स कसा बहरला? असा प्रश्न अनेकांना पडलेला. त्यावर आता स्वत: ललित मोदी बोलला आहे.

Lalit Modi : ती स्वत:च पैसे द्यायची, मी ठेवलेल्या..ललित मोदीने सुष्मिता सेन सोबतच्या रिलेशनशिपमधलं सत्य सांगितलं
Lalit Modi-Sushmita SenImage Credit source: Lalit Modi x
| Updated on: Jun 02, 2026 | 8:15 AM
Share

चार वर्षांपूर्वी ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांबद्दल बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु झालेल्या. ललित मोदी बिझनेसमन आणि आयपीएलचा माजी चेअरमन आहे. सुष्मिता सेन बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे. देशाबाहेर पळून गेलेला ललित मोदी आणि सुष्मिता सेन एकत्र कसे काय आले? हाच सर्वांना प्रश्न पडलेला. आता ललित मोदीने सुष्मिता सेन सोबतच्या त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. सुष्मिता सेनवर होणारे गोल्ड डिगरचे आरोप ललित मोदीने फेटाळून लावले आहेत. त्याने सुष्मिता सेनचा बचाव केला आहे. तिच्यावर होणारी टीका चुकीची असल्याचं ललित मोदीचं मत आहे. 2022 मध्ये ललित मोदी आणि सुष्मिताचे फोटो समोर आल्यानंतर दोघेही देशात चर्चेचा विषय बनलेले.

ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी दोघांच्या नात्याबद्दल बोलला. “मी माझा रोमान्स सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर जे ऑनलाइन नरेटिव तयार झालं, त्याने मला निराश केलं” असं ललित मोदी म्हणाला. सुष्मिता सेनवर होणारे गोल्ड डिगरचे आरोप ललित मोदीने खोडून काढले. “सुष्मिता सेन आर्थिक दृष्टया स्वतंत्र महिला आहे. तिने स्वत:ला घडवलं आहे. ती पैशांसाठी कोणावरही अवलंबून नाही” असं ललित मोदीने सांगितलं. “सुष्मिता सेन सुंदर, यशस्वी आणि स्वत:च्या पायावर उभी असणारी खंबीर महिला आहे. मला जे लोक माहित आहेत, त्यापैकी सर्वात जास्त हिरे तिच्याकडे आहेत. तिने स्वत: ते सर्व मिळवलेलं आहे. तिचं स्वत:च हिऱ्याचं दुकान आहे” असं ललित मोदी म्हणाला.

दोघांनी एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल ललित मोदी काय म्हणाला?

दोघांनी एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल बोलताना ललित मोदी म्हणाला की, “आम्ही दोघे एकत्र बाहेर गेलो आणि कुठल्या गोष्टीसाठी मला पैसे द्यायची वेळ आली असं झालं नाही. ती तिचे पैसे द्यायची. मी ठेवलेल्या प्रियकरासारखा होतो” सुष्मिता सेन माजी मिस युनिव्हर्स आहे. बॉलिवूडमध्ये काम करताना तिचं अनेकांसोबत नाव जोडलं गेलं. आजही ललित मोदींसाठी सुष्मिता सेन सोबतच नातं खास आहे. तिचं कौतुक करताना ललित मोदीने सांगितलं की, ‘ती कोणाकडून काही स्वीकारत नाही. लोक तिला जे गोल्ड डिगर बोलतात ते पूर्णपणे चुकीच आहे’ ‘तसं काही असेल तर ललित डायमंड डिगर आहे. सुष्मिता अस्सल हिरा आहे’ असं तो म्हणाला. सुष्मिता सेन माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आहे असं ललित मोदीने सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...