Rohit Sharma : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारत दबावाखाली आहे का ? रोहित शर्मा म्हणाला…

उद्याची मॅच सिडनीत एमसीएच्या मैदानात होणार आहे.

Rohit Sharma : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारत दबावाखाली आहे का ? रोहित शर्मा म्हणाला...
rohit sharma
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Oct 22, 2022 | 2:58 PM

मेलबर्न : टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात उद्या मॅच होणार आहे. उद्याच्या मॅचवर पावसाचं सावट असल्यामुळे चाहते आत्तापासून सोशल मीडियावर निराशा व्यक्त करीत आहेत. तसेच अनेकांनी तर आत्तापासून पाऊस पडला तर काय होईल याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. आशिया चषकात (Asia cup 2022) महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानकडून हारली होती. त्यामुळे आत्ता सुद्धा दडपणाखाली आहे का प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला होता.

ज्यावेळी एक पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये त्याने एका रोहित एक प्रश्न विचारला की पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारत दबावाखाली आहे का ? त्यावर रोहित म्हणाला की जी टीम चांगली खेळ करेल त्यांचा विजय होईल.

आशिया चषकासाठी टीम इंडि्या पाकिस्तानला जाणार का ? या रोहितने त्यावर आम्ही अद्याप विचार केला नाही असं सांगितलं. तसेच तिथल्या मैदानात तुम्ही टॉस जिंकणं महत्त्वाचं असेल असंही रोहितनं सांगितलं.

जेव्हा टीम इंडियाकडून खेळत असतो, तेव्हा माझ्यासाठी कोणतीही मॅच मोठी असते. त्यामुळे ज्या टीममधील खेळाडू चांगला खेळ करतील त्यांचा विजय निश्चत आहे.

उद्याची मॅच सिडनीत एमसीएच्या मैदानात होणार आहे.