AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : हार्दिक पंड्या 2027 वनडे वर्ल्ड कपच्या टीममधून OUT झाला तरी नो प्रॉब्लेम, भारताकडे दुसरा तगडा ऑप्शन तयार

Hardik Pandya : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा फिटनेस सध्या टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण हार्दिक सध्या 10 ओव्हर टाकण्याइतपतही फिट नाहीय. पण चिंता करण्याची गरज नाहीय.

Hardik Pandya : हार्दिक पंड्या 2027 वनडे वर्ल्ड कपच्या टीममधून OUT झाला तरी नो प्रॉब्लेम, भारताकडे दुसरा तगडा ऑप्शन तयार
Hardik Pandya Image Credit source: PTI
| Updated on: Sep 19, 2026 | 6:52 AM
Share

हार्दिक पंड्या आयपीएल नंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. कारण तो अजून फिटच नाहीय. त्यामुळे आता प्रश्न विचारणं सुरु झालय, तो वनडे वर्ल्ड कप 2027 च्या टीममध्ये असेल का?. टीम इंडियाने त्याच्याशिवाय आपली तयारी सुरु केली आहे का?. हेड कोच गौतम गंभीर यांनी त्याकडे इशारा सुद्धा केला आहे. हार्दिक पंड्या अजून 10 ओव्हर पण टाकू शकत नाहीय. तो पूर्णपणे फिट झाल्यानंतर त्याची टीम इंडियात निवड होईल असं हेड कोच गौतम गंभीर स्पष्टपणे म्हणाले. टीम इंडियाला हार्दिकच्या समावेशासाठी कुठलीही घाईगडबड करायची नाहीय. गौतम गंभीर यांनी हार्दिक पंड्याला पर्याय तयार केला आहे. पंड्या जरी खेळला नाही, तरी त्याची जागा भरुन काढणारा दुसरा खेळाडू तयार आहे. तो कोण आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.

नीतीश कुमार रेड्डी वनडे वर्ल्ड कप 2027 साठी पूर्णपणे तयार दिसतोय. बॅट आणि बॉलने दमदार प्रदर्शन करण्याची त्याची क्षमता आहे. त्याचा पुरावा तो सातत्याने देत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध सलग दोन सामन्यात त्याने प्रत्येकी 3-3 विकेट काढले. टी 20 फॉर्मेटमध्ये नितीश कुमार रेड्डीचा टप्पा आणि गती कमालीची होती. त्याचा चेंडूवर सॉलिड कंट्रोल दिसला. तो आधीपेक्षा घातक गोलंदाज वाटला.

दोन्ही फॉर्मेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट खूप जास्त

नीतीश रेड्डीला आपल्या गोलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता होती. तशी तो करतोय. फलंदाजीत तो पारंगत आहेच. टॉप ऑर्डर पासून मिडल ऑर्डर तो कुठल्याही क्रमांकावर खेळू शकतो. चांगल्या डिफेन्ससह मोठे फटके खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला आहे. नितीश कुमार रेड्डीने वनडे फॉर्मेटच्या चार इनिंगमध्ये 33.33 च्या सरासरीने 100 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये त्याने 30.33 च्या सरासरीने 91 धावा केल्या आहेत. दोन्ही फॉर्मेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट खूप जास्त आहे. नितीशला फक्त आपल्या फिटनेसची काळजी घेण्याची गरज आहे. अलीकडे त्याला बऱ्याचदा दुखापतीचा सामना करावा लागला आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं