AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : पदार्पणाचा सामना, नवदीप सैनीला जसप्रीत बुमराहचे 3 सल्ले

भारत ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या सामन्याच्या सुरुवातीआधी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नवदीप सैनीला (Navdeep Saini) टीम इंडियाची कॅप दिली.

IND vs AUS : पदार्पणाचा सामना, नवदीप सैनीला जसप्रीत बुमराहचे 3 सल्ले
जसप्रीत बुमराह नवदीप सैनी
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 07, 2021 | 12:16 PM
Share

सिडनी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND 3rd Test) यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं (Navdeep Saini) कसोटी पदार्पण केलं आहे. या तिसऱ्या सामन्याच्या सुरुवातीआधी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नवदीप सैनीला टीम इंडियाची कॅप दिली. यावेळी जसप्रीत बुमराहनं नवदीप सैनीला महत्वाच्या तीन गोष्टी सांगितल्या. टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी नवदीपचं अभिनंदन केलं. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Head Coach Ravi Shastri) सैनीला शुभेच्छा दिल्या. ( Jasprit Bumrah gave three messages to Navdeep Saini while giving team India cap)

जसप्रीत बुमराहच्या नवदीप सैनीला सांगितेल्या गोष्टी नवदीप सैनी टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण करणारा 299 वा खेळाडू ठरला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं नवदीपला टीम इंडियाची टेस्ट कॅप सोपवली. यावेळी जसप्रीत बुमराहनं नवदीपला कसोटी क्रिकेट विषयी महत्वाच्या तीन गोष्टी सांगितल्या.

1. कसोटी सामना खेळायला मिळणं ही सन्मानाची बाब आहे. हा सन्मान तुला मिळत आहे. 2. खूप मेहनत घेतल्यानंतर कसोटी सामन्यात खेळायला मिळते. 3. कसोटी सामने खेळायला मिळणं हा तुझा हक्क आहे. या तीन गोष्टी जसप्रीत बुमराहनं नवदीप सैनीला सांगितल्या.

BCCI चं ट्विट

उमेश यादवच्या जागेवर तीन खेळाडू स्पर्धेत

तिसऱ्या सामन्यासाठी 1 गोलंदाजाच्या जागेसाठी 3 खेळाडू शर्यतीत होते. मात्र बीसीसीआयने नवदीप सैनीला (Navdeep Saini) संधी दिली. नवदीप सैनीला दुखापतग्रस्त उमेश यादवच्या (Umesh Yadav) जागी संघात संधी देण्यात आली आहे. उमेशला ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पदार्पण करणारे खेळाडू

नवदीप सैनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कसोटी पदार्पण करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. रहाणेच्या नेतृत्वात सर्वात आधी कुलदीप यादवने कसोटी पदार्पण केलं होतं. तर यानंतर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या जोडीने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत पदार्पण केलं. तर आता नवदीप सैनी हा चौथा खेळाडू ठरला आहे.

संबंधित बातम्या:

AUS vs IND 3rd Test | वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण

Australia vs India, 3rd Test, 1st Day : विलो पुकोव्हस्कीचे अर्धशतक, चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया 93-1

(Jasprit Bumrah gave three messages to Navdeep Saini while giving team India cap)

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष