AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND 3rd Test | वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण

नवदीप सैनी टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 299 वा खेळाडू ठरला आहे.

AUS vs IND 3rd Test | वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण
नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण
| Updated on: Jan 07, 2021 | 10:08 AM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND 3rd Test) यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं कसोटी पदार्पण केलं आहे. तिसऱ्या सामन्यासाठी 1 गोलंदाजाच्या जागेसाठी 3 खेळाडू शर्यतीत होते. मात्र बीसीसीआयने नवदीप सैनीला (Navdeep Saini) संधी दिली. नवदीप सैनीला दुखापतग्रस्त उमेश यादवच्या (Umesh Yadav) जागी संघात संधी देण्यात आली आहे. उमेशला ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले. (aus vs ind 3rd test navdeep saini makes his test debut)

या तिसऱ्या सामन्याच्या सुरुवातीआधी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सैनीला टीम इंडियाची कॅप दिली. यावेळ टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी नवदीपचं अभिनंदन केलं. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Head Coach Ravi Shastri) सैनीला शुभेच्छा दिल्या. सैनी टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण करणारा 299 वा खेळाडू ठरला आहे.

नवदीपमध्ये 140 किमीच्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. नवदीपने याआधी टीम इंडियासाठी टी 20 आणि एकदिवसीय पदार्पण केलं आहे. नवदीपने 9 टी -20 सामन्यात 13 तसेच 7 वनडे सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत.

नवदीप मुळचा हरियाणााचा आहे. मात्र रणजी करंडकात तो दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो. नवदीपला काही वर्षांपूर्वी करनालमध्ये स्थानिक पातळीवरील स्पर्धांमध्ये एक सामन्यासाठी 200 रुपये रुपये मिळायचे. टेनिस ते सीजन असा खडतर आणि संघर्षपूर्ण प्रवास नवदीपने पार केला आहे. या तिसऱ्या सामन्यात नवदीपकडून टीम इंडियाला दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

टर्निंग पॉइंट

करनाल प्रीमियर लीग स्पर्धेत माजी गोलंदाज सुमित नरवाल सैनीच्या गोलंदाजीने प्रभावित झाले. त्यानंतर सैनीला दिल्लीला बोलावण्यात आलं. नवदीपच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा टर्निंग पॉइंट ठरला. माजी फलंदाज गौतम गंभीरने सैनीला पाठिंबा दिला. यानंतर 2013-14 मध्ये रणजी करंडकासाठी सैनीची दिल्ली संघासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर सैनीने मागे वळून पाहिलं नाही.

सैनीची प्रथम श्रेणी कारकिर्द

सैनीने 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 128 विकेट्स घेतल्या आहेत. 32 धावा देऊन 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. सैनीने एकूण 4 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. दरम्यान सैनीआधी ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनीही कसोटी पदार्पण केलं होतं.

रहाणेच्या नेतृत्वात पदार्पण करणारे खेळाडू

नवदीप सैनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कसोटी पदार्पण करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. रहाणेच्या नेतृत्वात सर्वात आधी कुलदीप यादवने कसोटी पदार्पण केलं होतं. तर यानंतर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या जोडीने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत पदार्पण केलं. तर आता नवदीप सैनी हा चौथा खेळाडू ठरला आहे.

संबंधित बातम्या :

AUS vs IND, 2nd Test | शुभमन गिल-मोहम्मद सिराजचे ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण

AUS vs IND 3rd Test | राष्ट्रगीत सुरु झालं अन् मोहम्मद सिराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

(aus vs ind 3rd test navdeep saini makes his test debut)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....