5

Australia vs India, 3rd Test, 1st Day HighLights : विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेनचे अर्धशतक, पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचा दबदबा

| Updated on: Jan 07, 2021 | 2:39 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे.

Australia vs India, 3rd Test, 1st Day HighLights : विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेनचे अर्धशतक, पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचा दबदबा
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया  यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ (Australia vs India 3rd Test) संपला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दिवसावर वर्चस्व राखलं आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसखेर 2 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन 67 धावांवर नाबाद आहे. तर विल पुकोव्हस्कीने 62 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. लाईव्ह स्कोअरकार्ड

पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त 

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाची निराशाजनक सुरुवात राहिली. डेव्हिड वॉर्नरने दुखापतीनंतर महिन्याभराने संघात पुनरागमन केलं. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. वॉर्नरला मोहम्मद सिराजने चेतेश्वर पुजाराच्या हाती 5 धावावंर कॅच आऊट केलं.

दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट लवकर गमावली. मात्र यानंतर दुसऱ्या विकेटसाठी मार्नस लाबुशाने आणि विल पुकोव्हस्कीने शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान विल पुकोव्हस्कीला रिषभ पंतकडून 2 जीवनदान मिळाले. पुकोव्हस्कीने याचा चांगलाच फायदा घेतला. त्याने अर्धशतक लगावलं. मात्र त्याला या अर्धशतकी खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. नवदीप सैनीने पुकोव्हस्कीला 62 धावांवर बाद केलं. पुकोव्हस्कीने 110 चेंडूंच्या मदतीने 4 चौकारांसह 62 धावा केल्या.

यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेनने तिसऱ्या विकेटासाठी दिवसखेर 60 धावांची नाबाद भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ 31 तर लाबुशेन 67 धावांवर खेळत होते.

पावसाचा व्यत्यय

पहिल्या दिवशी पावसाने घोळ घातला. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 55 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. कसोटीत दरदिवशी 90 ओव्हरचा खेळ अपेक्षित असतो. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 55 ओव्हरच खेळ होऊ शकला.

(australia vs india 2020 21 3rd test day 1 live cricket score updates online in marathi at sydney cricket ground)

पहिल्या दिवसखेर ऑस्ट्रेलिया 166-2

स्टीव्ह स्मिथ -31*

मार्नस  लाबुशेन -67*

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test : सिडनीवर इतिहास रचण्यास अजिंक्य रहाणे सज्ज, भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने

(australia vs india 2020 21 3rd test day 1 live cricket score updates online in marathi at sydney cricket ground)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 07 Jan 2021 12:52 PM (IST)

  मार्नस लाबुशेनचं अर्धशतक, ऑस्ट्रेलिया दीडशे पार

  मार्नस लाबुशेनने अर्धशतक पूर्ण केलं आहे. यानंंतर ऑस्ट्रेलियाने 150 धावांचा टप्पा पार केला आहे.

 • 07 Jan 2021 12:00 PM (IST)

  कांगारुंना दुसरा धक्का, विल पुकोव्हस्की बाद

  ऑस्ट्रेलियाने दुसरी विकेट गमावली आहे. नवदीप सैनीने विल पुकोव्हस्कीला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. पुकोव्हस्कीने 62 धावांची खेळी केली.

 • 07 Jan 2021 11:36 AM (IST)

  विलो पुकोव्हस्कीचे अर्धशतक, चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया 93-1

  चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने 93 धावा करुन 1 विकेट गमावली आहे. विल पुकोव्हस्कीने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तर मार्नस लाबुशेनने पुकोव्हस्कीला आतापर्यंत चांगली साथ दिली आहे.

  ऑस्ट्रेलिया 93-1

  विलो पुकोव्हस्की 54* मार्नलस लाबुशेन 34*

 • 07 Jan 2021 10:24 AM (IST)

  पुकोवस्की आणि लाबुशेनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, टीम इंडिया विकेटच्या शोधात

  ऑस्ट्रेलियाच्या पुकोवस्की मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. या जोडीने आतापर्यंत दुसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली आहे. यामुळे टीम इंडियासमोर ही जोडी तोडण्याचं आव्हान आहे.

 • 07 Jan 2021 09:49 AM (IST)

  पावसाच्या विश्रांतीनंतर खेळाला सुरुवात

  पावसाच्या विश्रांतीनंतर अखेर खेळाला सुरुवात झाली आहे.

 • 07 Jan 2021 08:07 AM (IST)

  नागपुरात पतंग पकडण्याच्या नादात 12 वर्षांच्या मुलाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

  पतंग पकडण्याच्या नादात गमावला जीव, पतंग पकडायला गेलेल्या 12 वर्षांच्या मुलाला रेल्वेने चिरडलं, एन्टा विनोद सोळंकी मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव, एन्टा पुलाखाली उघड्यावर आजीसोबत राहत होता, श्रीकृष्णधाम झोपडपट्टीजवळील रेल्वे रुळावर झाला अपघात

 • 07 Jan 2021 08:04 AM (IST)

  पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला, ऑस्ट्रेलियाचा स्कोअर - 21/1

  पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने 1 विकेट गमावून 21 धावा केल्या आहेत. मार्नस लाबुशेन 2* तर विल पुकोव्सकी 14* धावांवर नाबाद आहेत. पहिल्या सत्रात केवळ 7 ओव्हरचाच खेळ झाला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नरचा विकेट गमावला.

 • 07 Jan 2021 07:57 AM (IST)

  ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

  ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरच्या रुपात पहिला झटका बसला आहे. मोहम्मद सिराजने वॉर्नरला 5 धावांवर चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं.

 • 07 Jan 2021 07:51 AM (IST)

  टीम इंडियाचे अंतिम 11 खेळाडू

  तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये एकूण 2 बदल करण्यात आले आहेत. मयांक अग्रवालच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळाली आहे.

  अशी आहे टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार ), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी

 • 07 Jan 2021 07:47 AM (IST)

  नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण

  टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यातून वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने कसोटी पदार्पण केलं आहे. उमेश यादवच्या जागी सैनीला संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडूनही विल पुकोव्हस्कीनेही पदार्पण केलं आहे.

  जसप्रीत बुमराहने नवदीप सैनीला कॅप देऊन स्वागत केलं

 • 07 Jan 2021 07:43 AM (IST)

  ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

  ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय 

Published On - Jan 07,2021 1:20 PM

Follow us
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले