5

Aus vs Ind 3rd Test : सिडनीवर इतिहास रचण्यास अजिंक्य रहाणे सज्ज, भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 5 वाजता सुरु होणार आहे.

Aus vs Ind 3rd Test : सिडनीवर इतिहास रचण्यास अजिंक्य रहाणे सज्ज, भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 7:34 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना (Aus vs Ind 3rd Test) गुरुवार 7 जानेवारीला खेळण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे. या सामन्याला 7 जानेवारीला सकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने सिडनीवर 42 वर्षांपूर्वी अखेरचा आणि एकमेव विजय मिळवला होता. यामुळे अजिंक्य रहाणेला पुन्हा 42 वर्षांनी आपल्या नेतृत्वात इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. (Australia vs india 3rd Test sydney cricket ground match preview)

रोहितचं पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत हिटमॅन रोहित शर्माचं (Rohit Sharma) पुनरागमन केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची बाजू आणखी मजबूत झाली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाची सलामी जोडी अपयशी ठरली. त्यामुळे रोहितकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.

नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण

वेगवान गोलंदाज नवदीप सैनीसाठी (Navdeep Saini) ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना पदार्पणातील सामना ठरणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण करणारा तो 299 वा खेळाडू ठरणार आहे. त्यामुळे सैनी पदार्पणात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

सिडनीवरील आकडेवारी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने सिडनीवरील एकमेव सामना हा 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. हा सामना 12 जानेवारी 1978 रोजी खेळला गेला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सिडनीवर विजय मिळवता आलेला नाही. यामुळे हा इतिहास अजिंक्य रहाणेला खोडून काढण्याची संधी आहे.

अशी आहे टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार ), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | सिडनी कसोटीत टीम इंडियाची मदार दोन मुंबईकरांवर

Aus vs Ind 3rd Test | रोहित शर्माचं पुनरागमन, नवदीप सैनीला पदार्पणाची संधी, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

(Australia vs india 3rd Test sydney cricket ground match preview)

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले