Aus vs Ind 3rd Test | रोहित शर्माचं पुनरागमन, नवदीप सैनीला पदार्पणाची संधी, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

हा तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) खेळण्यात येणार आहे.

Aus vs Ind 3rd Test | रोहित शर्माचं पुनरागमन, नवदीप सैनीला पदार्पणाची संधी, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 12:59 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यात तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये (SCG) खेळला जाणार आहे. या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) संघात पुनरागमन केलं आहे. तर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला (T Natrajan) संधी देण्यात आली आहे. यानिमित्ताने सैनीचं कसोटी पदार्पण ठरणार आहे. (Aus vs Ind 3rd Test Team India announced squad for the third Test rohit sharma returns and Navdeep Saini gets chance to debut)

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा 

उमेश यादवला दुसऱ्या कसोटीत गोलंदाजीदरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला या मालिकेला मुकावे लागले. त्याच्या जागेवर थंगारासू नटराजनला संघात समाविष्ट करण्यात आले. नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र अखेर नवदीप सैनीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

हिटमॅनचं कमबॅक

मोठ्या प्रतिक्षेनंतर हिटमॅन रोहित शर्माचं टीम इंडियात पुनरागन झालं आहे. मयांक अग्रवालला विश्रांती देऊन रोहितला संघात स्थान देण्यात आलं आहे. रोहितच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. यामुळे रोहित या तिसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करतो, याकडे टीम इंडियच्या समर्थकांचे लक्ष असणार आहे.

सिडनीवरील हेड टु हेड कामगिरी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टीम इंडियाने हा एकमेव सामना 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. हा सामना 12 जानेवारी 1978 रोजी खेळला गेला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सिडनीवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेला या मैदानावर इतिहास घडवण्याची संधी आहे.

केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच संधी

खबरदारी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. सिडनी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांनाच हा सामना स्टेडियममध्ये येऊन पाहता येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडू ,सदस्य आणि प्रेक्षकांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार ), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी

संबंधित बातम्या :

Ind Vs Aus : सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्माचं पुनरागमन नक्की, शार्दुल आणि सैनीपैकी कुणाला मिळणार संधी?

(Aus vs Ind 3rd Test Team India announced squad for the third Test rohit sharma returns and Navdeep Saini gets chance to debut)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.