AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Aus : सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्माचं पुनरागमन नक्की, शार्दुल आणि सैनीपैकी कुणाला मिळणार संधी?

बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavskar Trophy) तिसरा कसोटी सामना सिडनीत (Sydney) खेळण्यात येणार आहे.

Ind Vs Aus : सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्माचं पुनरागमन नक्की, शार्दुल आणि सैनीपैकी कुणाला मिळणार संधी?
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 05, 2021 | 7:46 PM
Share

सिडनी : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavskar Trophy) तिसरा कसोटी सामना सिडनीत (Sydney) खेळण्यात येणार आहे. ही तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडिया सिडनीमध्ये पोहचली आहे. तिसऱ्या कसोटीत सलामीचा फलंदाज म्हणून मयांक अग्रवालच्या (mayank Agrawal) जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार असल्याचं आता जवळपास निश्चित आहे. तर दुखापतग्रस्त उमेश यादवच्या (Umesh Yadav) जागी शार्दुल ठाकूर (Shardul Thackur) किंवा नवदीप सैनी (navdeep Saini) यापैकी एकाची निवड होणार आहे. (India Vs Australia 3rd Test Shardul And Saini Big Question Rohit replace mayank)

मयांक अग्रवालला पाठीमागच्या आठ कसोटी डावांपैकी सात डावांमध्ये समाधानकारक कामगिरी करण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी रोहित शर्माला टीम इंडियात सामिल करण्यात संघ व्यवस्थापनाला कुठलीही अडचण येणार नाही.

पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी मुंबईचा जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या टीम इंडियातल्या समावेशावरती अनेक दिग्गजांचं चांगलं मत होतं. परंतु आता नवदीप सैनीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या बोलिंगने हैरान केलं आहे. त्याच्या स्पीडने ऑस्ट्रेलियन बॅट्समनची दांडी गुल झाली आहे. तसंच बॅटिंग करण्यात देखील शार्दुल माहिर मानला जातो.

तिसरा बोलर कोण यासाठी आजचा दिवस जाऊ द्यावा लागणार आहे. कारण मंगळवारी संपूर्ण पीचवर आवरण होतं. बुधवारी पूर्ण पीच आणि बाकीची परिस्थिती पाहून टीममध्ये कुणाकुणाला स्थान मिळेल, हे स्पष्ट होईल. जर ढगाळ वातावरण राहिलं आणि पीचमध्ये थोडासा ओलसरपणा राहिला तर संघात शार्दुल ठाकूरची वर्णी लागू शकते. जर पीच सपाट राहिलं तर नवदीप सैनीला संघात स्थान मिळू शकते.

केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच संधी

खबरदारी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. सिडनी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांनाच हा सामना स्टेडियममध्ये येऊन पाहता येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडू ,सदस्य आणि प्रेक्षकांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.

सिडनीवरील हेड टु हेड कामगिरी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टीम इंडियाने हा एकमेव सामना 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. हा सामना 12 जानेवारी 1978 रोजी खेळला गेला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सिडनीवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेला या मैदानावर इतिहास घडवण्याची संधी आहे.

(India Vs Australia 3rd Test Shardul And Saini Big Question Rohit replace mayank)

हे ही वाचा

aus vs india | टीम इंडिया सिडनीमध्ये दाखल, हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई

Australia vs India 3rd test | मिशन ‘अजिंक्य’, सिडनी कसोटीत रहाणेला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लॅन

Sydney Test | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, स्टेडियममध्ये मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?