AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India 3rd test | मिशन ‘अजिंक्य’, सिडनी कसोटीत रहाणेला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लॅन

रहाणेने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाज आणि कर्णधार अशा दोन्ही भूमिका सार्थपणे पार पाडल्या.

Australia vs India 3rd test | मिशन 'अजिंक्य', सिडनी कसोटीत रहाणेला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लॅन
अजिंक्य रहाणेला तिसऱ्या कसोटीत रोखण्यासाठी कांगारुंचा मास्टर प्लान
| Updated on: Jan 04, 2021 | 12:53 PM
Share

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (Australia vs India) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केलं. या विजयामुळे टीम इंडियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनीत खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. या तिसऱ्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेला रोखण्यासाठी रणनिती करणार आहोत, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने (Nathan Lyon) दिली आहे. (australia vs india test series special plan against ajinkya rahane for 3rd sydney test match said nathan lyon)

लायन काय म्हणाला?

“रहाणे जागतिक स्तरावरील फलंदाज आहे. तो फार धैर्याने मैदानात खेळतो. यामुळे त्याला बाद करणं आणखी कठीण होतं. अजिंक्य बॅटिंगदरम्यान चुका करत नाही. तो तुम्हाला आऊट करण्याची संधी देत नाही. अजिंक्य फार शांत चित्ताने फलंदाजी करतो. तो मैदानात खंबीरपणे कर्णधाराची भूमिका पार पाडतो. त्यामुळे रहाणेला सिडनी कसोटीत रोखण्यासाठी आमची रणनिती असणार आहे. आम्ही यावर नक्कीच अमल करु,” असं लायन म्हणाला. लायन पत्रकार परिषदेत बोलत होता.

विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर विराट मायदेशी परतला. त्यामुळे अजिंक्यला टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. रहाणेने ही जबाबदारी चोखपणे पार पाडली. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या खेळाडूंना हाताशी घेत रहाणेने टीम इंडियाला सामना जिंकवून दिला. तसेच रहाणेने शानदार शतकी कामगिरी केली. रहाणेने फलंदाज आणि कर्णधार अशा 2 भूमिका सार्थपणे पार पाडल्या.  त्यामुळे रहाणेचं कौतुकही केलं.

या विजयामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे. तसेच रोहित शर्माचेही संघात पुनरागमन झालंय. यामुळे टीम इंडियाची बाजू भक्कम झाली आहे. दरम्यान टीम इंडिया तिसऱ्या कसोटीसाठी सिडनीती पोहचली आहे. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे. तिसरा कसोटी सामन्याला 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे.

केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच संधी

सिडनीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यात तिसरा सामनाही सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. यामुळे खबरदारी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. सिडनी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांनाच हा सामना स्टेडियममध्ये येऊन पाहता येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडू ,सदस्य आणि प्रेक्षकांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India Test Series | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, स्टेडियममध्ये मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश

Ind vs Aus | सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज

(australia vs india test series special plan against ajinkya rahane for 3rd sydney test match said nathan lyon)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.