AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केदारनाथ मंदिराचे ‘या’ तारखेला विधीवत दरवाजे उघडणार, ओंकारेश्वर धाममध्ये घोषणा

यावर्षी श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी लवकरच उघडतील. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भाविकांसाठी ओंकारेश्वर मंदिराचे दरवाजे उघडणार असल्याची केदारनाथ संस्थेकडून घोषणा करण्यात आली. चला आजच्या लेखात आपण ओंकारेश्वर मंदिराचे दरवाजे कोणत्या तारखेला किती वाजता उघडणार ते जाणून घेऊयात.

केदारनाथ मंदिराचे 'या' तारखेला विधीवत दरवाजे उघडणार, ओंकारेश्वर धाममध्ये घोषणा
kedarnath templeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 15, 2026 | 8:45 PM
Share

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भोलेनाथ भाविकांची प्रतिक्षा संपलेली आहे. कारण लवकरच सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे लवकरच उघडणार असल्याची घोषणा संस्थेकडून करण्यात आलेली आहे. तर महाशिवरात्री निमित्त रावल यांनी उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात विधी केल्यानंतर दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर केली. नियोजित शुभ वेळेनुसार 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:00 वाजता बाबा केदारनाथचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडले जातील. तारीख निश्चित होताच तेथील प्रशासन आणि मंदिर समितीने भाविकांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे.

22 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता भाविकांना ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येईल. मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी पदपथाची दुरुस्ती, राहण्याचे ठिकाणं आणि वैद्यकीय सुविधांसाठी एक विशेष योजना विकसित करण्यात आली आहे.

हिवाळी यात्रेला प्रचंड प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या हिवाळी यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद झाल्यापासून ते 31 जानेवारीपर्यंत, 34 हजार 140 यात्रेकरूंनी चार धामांच्या हिवाळी तीर्थस्थळांना जसे की ओंकारेश्वर आणि पांडुकेश्वर मंदिरे भेट दिली आहे. उत्तराखंड पर्यटनासाठी हे एक नवीन ठिकाण प्रचलित झाले आहे.

चारधामसाठी रेल्वे सेवा

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच चारधाम कनेक्टिव्हिटीबाबत महत्त्वाची माहिती दिली. 125 किमी लांबीच्या ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथपर्यंत रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

उत्तराखंडमध्ये एकूण 216 किमी लांबीच्या तीन नवीन रेल्वे मार्गांवर काम सुरू आहे, ज्यासाठी किंमत 40,384 कोटी रूपयांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यातच मार्च 2025 पर्यंत या कामासाठी अंदाजे 19 हजार 898 रूपये कोटी खर्च करण्यात आले आहेत.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.