Kapil Dev: सचिन तेंडुलकर व्हायचंय की विनोद कांबळी? कपिल देव यांनी Vaibhav Sooryavanshi ला झापलं

Kapil Dev On Vaibhav Sooryavanshi: भारतीय माजी फलंदाज कपिल देव यांनी वैभव सूर्यवंशीला एक सल्ला दिला आहे. या सल्ल्याच्या वेळी त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा उल्लेख केला आहे.

Kapil Dev: सचिन तेंडुलकर व्हायचंय की विनोद कांबळी? कपिल देव यांनी Vaibhav Sooryavanshi ला झापलं
| Updated on: Nov 16, 2026 | 1:57 PM

युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवत आहे. त्याची स्फोटक शैली सर्वांनाच आकर्षित करत आहे. त्याने टीम इंडियासाठी अधिक सामने खेळावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही वैभवचे कौतुक केले, पण यावेळी त्यांनी त्याला एक मोलाचा सल्लाही दिला आहे.

कपिल देव म्हणाले की, “वैभव फक्त १५ वर्षांचा आहे आणि त्याने केवळ क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. वैभव सचिन तेंडुलकर बनतो की विनोद कांबळी, हे पाहणे बाकी आहे. दोन्ही फलंदाज लहानपणापासूनच खूप प्रतिभावान मानले जात होते. मात्र, सचिनने क्रिकेट विश्वात प्रगती केली, तर कांबळी मागे राहिला. कांबळीची प्रकृती सध्या खूपच खालावली असून, यामागे दारू हे कारण असल्याचे म्हटले जाते.”

Loading...

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाले, “त्याच्याकडे अजून खूप वेळ आहे. तो भारतीय संघाचा भाग आहे आणि त्याला फारशा संधी मिळत नाहीत. मला वाटतं की प्रत्येकाला ॲक्शन आवडते. मग ते वृद्ध असोत किंवा तरुण, प्रत्येकाला वैभव ज्याप्रकारे चौकार आणि षटकार मारतो ते पाहायचे असते. त्याला फक्त वेळेची गरज आहे. त्याच्याकडे प्रतिभेची कमतरता नाही.”

कपिल म्हणाले की, “वैभवने सध्या फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.  इतर कशावरही नाही. वयाच्या १५ व्या वर्षी त्याने फक्त क्रिकेटचाच विचार केला पाहिजे. जेव्हा तो १८-१९ वर्षांचा होईल, तेव्हा अनेक गोष्टी समोर येतील, पार्ट्या आणि इतर अनेक गोष्टींमुळे त्याचे लक्ष विचलित होईल. तो सचिन किंवा कांबळी बनेल का? हे या क्षणी सांगणे खूप कठीण आहे.”

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीची बिहार संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. संघ त्याच्या नेतृत्वाखाली पहिला सामना खेळला. संघ हरला आणि वैभवची बॅटही चांगली कामगिरी करू शकली नाही. आता तो रायजिंग स्टारर्स आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us