किंग कोहलीची मोहालीत एन्ट्री, चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मोहम्मद शमीच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शमी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं तो खेळू शकणार नाही.

किंग कोहलीची मोहालीत एन्ट्री, चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या
विराट कोहलीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 3:45 PM

नवी दिल्ली : स्टार क्रिकेटर विराट कोहलीही (Virat Kohali) आज मोहालीत पोहोचला. याठिकाणी टीम इंडियाला (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia cricket team) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. मोहालीच्या मैदानावर कोहलीच्या नावावर मोठा विक्रम आहे. कोहलीच्या दमदार कामगिरीमुळे कदाचित ऑस्ट्रेलियाचा संघही घाबरून असले, असंही त्याचे चाहते  म्हणतायत. विराट कोहली आशिया कपनंतर थेट लंडनला होता. याठिकाणी त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. तेथून आता कोहलीनं थेट मोहाली गाठली आहे. याठिकाणी तो येताच सरावासाठी रवाना झाला.

कारकिर्दीतील 71वे शतक

आशिया कप कोहलीसाठी खूप खास होता. याठिकाणी विराटनं दोन अर्धशतकांसह त्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर कारकिर्दीतील 71वे शतकही झळकावलंय. कोहलीला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही हाच फॉर्म कायम ठेवायला आवडेल.

हा रेकॉर्डही वाचा….

मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर कोहलीनं दोन टी-20 सामने खेळले आहेत. या दोन सामन्यांमध्ये त्यानं 154 धावा केल्या आहेत. 2016 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 82 धावा केल्या होत्या. तर 2019 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 72 धावा केल्या होत्या. याशिवाय कोहलीनं सात एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. यात त्याच्या नावावर 309 धावा आहेत.

मोहाली मैदानाविषयी…

याच मैदानावर 2016 मध्ये कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 154 धावांची नाबाद खेळी खेळली होती. कोहलीने मोहालीच्या मैदानावर चार कसोटी सामनेही खेळले असून त्यात त्याच्या नावावर 244 धावा आहेत. त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत, त्यापैकी एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

मोहम्मद शमीही बाद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मोहम्मद शमीच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शमी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं तो खेळू शकणार नाही.

उमेश यादवला संधी

बीसीसीआयनं एका निवेदनात म्हटलंय की, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन T20I मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी निवड समितीने उमेश यादवचा संघात समावेश केला आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.