AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: गिल, कोहलीला डावलून भलत्यालाच सामनावीर पुरस्कार दिला, ‘तो’ही शॉक म्हणाला, अरे मला कसं काय दिला?

IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरु आहे, या मालिकेतील पहिला वनडे सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. सामन्यात शुभमन गिल आणि विराट कोहलीने शतक ठोकले पण सामनावीर भलत्याच मिळाला.

IND vs WI: गिल, कोहलीला डावलून भलत्यालाच सामनावीर पुरस्कार दिला, 'तो'ही शॉक म्हणाला, अरे मला कसं काय दिला?
| Updated on: Sep 28, 2026 | 8:37 AM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदाच एका एकदिवसीय डावात एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ षटकार ठोकले. आपल्या या स्फोटक खेळीसाठी कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले नाही आणि जेव्हा चार बळी घेणाऱ्या कुलदीप यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. सामनावीरनंतर कुलदीप यादव जे म्हणाला त्याची आता चर्चा होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने एकही गडी न गमावता १३५ धावा केल्या होत्या. कुलदीप यादवने भारताला पहिला बळी मिळवून दिला आणि त्यानंतर सलग बळी घेत राहिला. परिणामी, ३५० धावांपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत असलेला वेस्ट इंडिज संघ केवळ २९५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. कुलदीपने १० षटकांत ४० धावा देऊन चार बळी घेतले आणि यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. कुलदीप म्हणाला, “मला हा पुरस्कार का दिला जात आहे हे मला कळत नाही. शुभमन गिल आणि कोहली ज्या प्रकारची खेळी खेळले, ते या पुरस्कारासाठी पात्र होते. त्यांना खेळताना पाहणे आनंददायक होते आणि हा पुरस्कार स्वीकारताना मला थोडे विचित्र वाटत आहे.”

वेस्ट इंडिजने एकही गडी न गमावता झटपट १३५ धावांची सलामीची भागीदारी रचली. त्यानंतर, ते सहजपणे ३५० किंवा त्याहून अधिक धावा करतील असे वाटत होते. पण कुलदीप यादवने गोलंदाजीला येऊन मधल्या षटकांमध्ये त्यांच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आणि १३५ धावांवर पहिला गडी गमावल्यानंतर विंडीज संघ केवळ २९५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. प्रत्युत्तरात, भारतासाठी शुभमन गिलने ११० धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने ८८ चेंडूंमध्ये १० चौकार आणि नऊ षटकारांसह १३९ धावांची वादळी खेळी करून एकतर्फी विजय मिळवून दिला. विराटच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने अवघ्या ४१.३ षटकांत दोन गडी गमावून ३०० धावा केल्या आणि आठ गडी राखून विजय मिळवला. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ३० सप्टेंबरपासून खेळला जाईल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?