Ind vs NZ: हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची उद्या पहिली मॅच, लक्ष्मणचा गुरुमंत्र

हार्दीक पांड्या टीम इंडियाचं पहिल्यादा नेतृत्व करीत आहे.

Ind vs NZ: हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची उद्या पहिली मॅच, लक्ष्मणचा गुरुमंत्र
IND vs NZ
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 17, 2022 | 1:00 PM

मुंबई: उद्या टीम इंडिया (Ind) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात महामुकाबला होणार आहे. उद्याच्या मॅचसाठी टीम इंडिया कसून सराव करीत आहे. T20 मालिकेसाठी टीमचं नेतृ्त्व हार्दीक पांड्याकडे (Hardik Pandhya) देण्यात आलं आहे, तर प्रशिक्षक पदाची जबाबदारी लक्ष्मण यांच्याकडे देण्यात आली आहे. टी 20 मालिकेसाठी टीम इंडीयात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मॅचची परिस्थिती पाहून बेधक खेळी करा, असा गुरुमंत्र लक्ष्मणने दिला आहे. हार्दीक पांड्या टीम इंडियाचं पहिल्यादा नेतृत्व करीत आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा न्यूझिलंड दौरा होणार आहे. बीसीसीआय भविष्यात टीममध्ये मोठा बदल करणार आहे.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक सिंह, चहल. कुलदीप सेन, उमरान मलिक

भारत-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 (वेलिंग्टन)
दुसरा T20: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (माउंट मौनगानुई)
तिसरा T20: 22 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (नेपियर)
पहिला एकदिवसीय: 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (ऑकलंड)
दुसरी वनडे: 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (हॅमिल्टन)
तिसरी वनडे: ३० नोव्हेंबर २०२२, सकाळी ७:०० (ख्रिस्टचर्च)