AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palash Muchhal : दोन महिने बेभान चॅटिंग, पलाशने भेटायला बोलवलं, पण…मेरीचा थेट समोर येत खळबळजनक खुलासा!

पलाश मुच्छल मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीशी चॅटिंग करत होता, असा दावा केला जातोय. असे असतानाच आता मेरी डिकॉस्टाने समोर येत नवे आणि खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Palash Muchhal : दोन महिने बेभान चॅटिंग, पलाशने भेटायला बोलवलं, पण...मेरीचा थेट समोर येत खळबळजनक खुलासा!
smriti mandhana and palash muchhalImage Credit source: instagram
| Updated on: Nov 26, 2025 | 6:00 PM
Share

Palash Muchhal And Smriti Mandhana : संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटर स्मृती मानधना यांचा 23 नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. मात्र स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीने पलाश मुच्छलसोबतच्या कथित चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले. हे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी पलाश तसेच मेरी या दोघांवरही टीका करत आहेत. पलाशने स्मृतीला अंधारात ठेवले. तिला धोका दिला, अशी भावना व्यक्त केली जात आहे. सोबतच मेरीने लग्न पुढे ढकलल्यानंतरच का स्क्रीनशॉट शेअर केले? असा सवालही केला जात आहे. असे असतानाच मेरीने आता पलाशसोबतच्या कथित चॅटिंगविषयी अधिक माहिती दिली आहे. यासह पलाशला भेटले होते का? स्क्रीनशॉट का व्हायरल केले, याबाबतही तिने सविस्तर माहिती दिली आहे.

चॅटिंगचे स्क्रीनशॉट झाले व्हायरल

मेरी डिकॉस्टाची नवी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने बरंच काही लिहिलं आहे. विशेष म्हणजे पलाशसोबत चॅटिंग करणारी मीच असून मीच ते स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत, असेही तिने सांगितले आहे. यासह तीने मी कोरिओग्राफर नाही. पलाशसोबत माझे कोणतेही नाते नव्हते, असेही मेरीने स्पष्ट केले आहे.

किती काळ चॅटिंग केली?

मेरीने आपल्या या पोस्टमध्ये पलाशसोबत नेमके किती काळ चॅटिंग केली याबाबतही माहिती दिली आहे. “मला माझी ओळख सार्वजनिक करायची नाही. पण पलाशसोबतच्या चॅटिंगचे फोटो मीच व्हायरल केले आहेत. ही चॅटिंग 2025 सालातील मे आणि जुलै महिन्यातील आहे. ही चॅटिंग फक्त एक महिना चालली. कोणत्याही पद्धतीने मी त्याच्यात गुंतलेली नाही. मी त्याला भेटलेली नाही,” असे मेरीने स्पष्ट केले आहे. सोबतच मला पलाशला उघडे पाडायचे होते. मला तो कोण आहे हेदेखील माहिती नव्हते, असेही मेरीने स्पष्ट केले आहे. मी स्मृती मानधानाचा आदर करते. मला फक्त या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या, अशा भावना मेरीने व्यक्त केल्या आहेत.

मला टार्गेट करू नका

सोबतच पुढे मेरीने मीच पलाशकडे दुर्लक्ष केले, असेही तिने स्पष्ट केले. मी कोणत्याही महिलेशी कधीही वाईटपणे वागणार नाही. मला कोणीही लक्ष्य करू नये. मला अशा परिस्थितीतून जावे लागल, याची मला कल्पनाच नव्हती, असे म्हणत तिने नेटकऱ्यांनी टार्गेट न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पलाशच्या बाजूने नेमके काय स्पष्टीकरण येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?