AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, MI vs DC : रोहितची लय बिघडू शकते, आम्ही त्याचा फायदा उठवू : शिखर धवन

रोहित शर्माच्या गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने क्वालिफायर सामन्यात थाटात पुनरागमन करणं रोहितसाठी आव्हानात्मक असेल, असं मत शिखर धवनने व्यक्त केलं आहे.

IPL 2020, MI vs DC : रोहितची लय बिघडू शकते, आम्ही त्याचा फायदा उठवू : शिखर धवन
| Updated on: Nov 04, 2020 | 11:42 PM
Share

यूएईआयलीएल 2020 (IPL 2020) च्या प्ले ऑफचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers banglore) आणि सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई अव्वल स्थानावर विराजमान आहे तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (5 नोव्हेंबर) रोजी यंदाच्या हंगामातील पहिली क्वालिफायर मॅच होत आहे. या मॅचच्या पूर्वसंध्येला दिल्लीचा तडाखेबाज बॅट्समन शिखर धवनने (Shikhar Dhawan) मुंबईचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलं आहे. (Mi Rohit Sharma Lost touch We will take Advantage Says Shikhar Dhawan)

रोहित शर्माच्या गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने थाटात पुनरागमन करणं रोहितसाठी आव्हानात्मक असेल. अशा परिस्थितीत त्याची लय बिघडू शकते. याचाच फायदा आम्ही उठवण्याचा प्रयत्न करु, असं शिखर धवन म्हणाला. मोठ्या मॅचमध्ये कमबॅक करताना खेळाडूंवर दडपण असतं. दिल्ली-मुंबई क्वालिफायर मॅच होत असल्याने रोहितसाठी पूर्वीचा फॉर्म घेऊन मैदानात उतरणं अवघड असेल, असं शिखर म्हणाला.

“रोहित शर्मा हा एक चांगला आणि दर्जेदार खेळाडू आहे. त्याने या आयपीएलच्या हंगामात बरेच सामने खेळले नाहीत. त्यामुळे मला त्याच्या फॉर्मबद्दल जास्त माहिती नाही. पण कमी सामने खेळल्याने फॉर्म टिकवणं त्याच्यासाठी नक्कीच आव्हान असेल आणि त्याचाच फायदा उठवण्याचा आम्ही प्रयत्न करु”, असं शिखर म्हणाला.

पुढे बोलताना शिखर धवन म्हणाला, “माझ्या सदिच्छा रोहितबरोबर आहेत. परंतु विरोधी संघात असल्याने रोहितच्या दुखापतीमुळे त्याची लय बिघडवण्याचा तसंच त्याच्याविरोधातली रणनिती तश्याच प्रकारे बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”.

दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही. परंतु त्याची दुखापत लवकरच बरी व्हावी, अशी मी प्रार्थना करतो, अशा सदिच्छाही शिखरने यावेळी व्यक्त केली.

दुसरीकडे बुधवारी शारजामध्ये झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफमध्ये धडक मारली. हैदराबादच्या विजयानंतर प्ले ऑफचं चित्र स्पष्ट होऊन पहिला क्लालिफायर सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात होणार आहे तर दुसरा क्वालिफायर सामना रॉयल्स चॅलेज बंगळुरु विरुद्ध हैदराबाद या दोन टीममध्ये होणार आहे.

(Mi Rohit Sharma Lost touch We will take Advantage Says Shikhar Dhawan)

संबंधित बातम्या

IPL 2020, SRH vs MI : ऋद्धीमान साहा-डेव्हिड वॉर्नरची धमाकेदार खेळी, मुंबईवर 10 विकेट्सने मात, हैदराबादची प्ले ऑफमध्ये धडक

Women’s T20 Challenge | बुधवारपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.