Women’s T20 Challenge | बुधवारपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

महिला आयपीएलच्या 3 ऱ्या पर्वाला 4 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

Women’s T20 Challenge | बुधवारपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
sanjay patil

|

Nov 03, 2020 | 10:29 PM

शारजा : आयपीएलचा 13 वा (IPL 2020) मोसम अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. यानंतर आता उद्यापासून (4 नोव्हेंबर) वुमन्स टी 20 चॅलेंज ( Women’s T20 Challenge) स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा एकूण 6 दिवस चालणार आहे. 9 नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 4 सामने खेळण्यात येणार आहे. हे चारही सामने शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहेत. या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यांना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर उर्वरित एक सामना दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी खेळण्यात येणार आहे. The Women’s T20 Challenge starts on November 4 in the UAE

या स्पर्धेत 3 संघांचा समावेश असणार आहे. सुपरनोवाज (Supernovas), ट्रेलब्लेझर्स (Trailblazers) आणि वेलोसिटी (Velocity) असे 3 संघ असणार आहेत. या तिन्ही संघांचे नेतृत्व टीम इंडियाच्या महिला खेळाडू करणार आहेत. हरमनप्रीत कौर सुपरनोवाज संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच स्मृती मंधानाच्या खांद्यावर ट्रेलब्लेझर्स टीमची जबाबदारी असणार आहे. तर मिताली राज वेलोसिटी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

वूमन्स टी 20 चॅलेंज स्पर्धेचं 2018 मध्ये पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स असे दोनच संघ होते. त्यावेळेस केवळ 1 सामनाच खेळवण्यात आला होता. गेल्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये वेलोसिटी संघाचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला. यासह एकूण 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना आणि फायनल असे एकूण 4 सामने खेळण्यात आले. यामध्ये सुपरनोवाजने विजेतेपद पटकावलं होतं. या स्पर्धेत या वर्षी आणखी एका संघाचा समावेश करण्यात येणार होता. मात्र कोरोना परिस्थितीमुळे असे करता आले नाही.

परदेशातील महिला खेळाडू

वूमन्स टी 20 चॅलेंज स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंसह परदेशातील महिला खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये इंग्लंड, वेस्टइंडिज, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण अफ्रिका आणि थायलंड या टीममधील खेळाडूंचाही समावेश आहे.

असं आहे टी 20 स्पर्धेचं वेळपत्रक

पहिला सामना : सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी, 4 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

दुसरा सामना : वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, 5 नोव्हेंबर, दुपारी 3:30 वाजता

तिसरा सामना : ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज – 7 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

फायनल: 9 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

असे आहेत संघ

सुपरनोवाज (Supernovas) : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक

ट्रेलब्लेझर्स (Trailblazers) : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम

वेलोसिटी (Velocity) : मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ति , शैफाली वर्मा, सुषमा वर्मा (विकेटकीपर), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देव्या वैद्य, सुष्री दिब्यादर्शिनी, मनाली दक्षिणिणी, लीघ कास्पेरेक, डॅनियल व्यान लुस, जहाँआरा आलम आणि एम अनघा

संबंधित बातम्या :

Women’s T20 Challenge | BCCI कडून महिला आयपीएल संघाची घोषणा, या दिवसापासून रंगणार स्पर्धा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

नीतू डेव्हिड भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या राष्ट्रीय निवड समितीच्या प्रमुखपदी

The Women’s T20 Challenge starts on November 4 in the UAE

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें