AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s T20 Challenge | BCCI कडून महिला आयपीएल संघाची घोषणा, या दिवसापासून रंगणार स्पर्धा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

या स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. (BCCI announces squads for Women’s T20 Challenge)

Women’s T20 Challenge | BCCI कडून महिला आयपीएल संघाची घोषणा, या दिवसापासून रंगणार स्पर्धा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
| Updated on: Oct 11, 2020 | 6:50 PM
Share

मुंबई : यूएईमध्ये आयपीएल (IPL 2020) स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन होत आहे. मात्र आता क्रिकेटप्रेमींचं दुप्पट मनोरंजन होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) महिला टी 20 चॅलेंज (Womens T 20) स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने रविवारी 11 ऑक्टोबरला टी 20 चॅलेंज स्पर्धेसाठी 3 संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. ही स्पर्धा एकूण 6 दिवस खेळण्यात येणार आहे. (BCCI announces squads for Women’s T20 Challenge)

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसोबतच इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, वेस्टइंडीज, बांग्लादेश आणि न्यूझीलंड संघाच्या महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. या टी 20 स्पर्धेला 4 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 9 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे.

नेतृत्वाची जबाबदारी भारतीय खेळाडूंकडे

या तीन संघांचे नेतृत्व भारतीय महिला संघाच्या खेळाडू हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि मिताली राज करणार आहेत. हरमनप्रीत कौर सुपरनोवाज संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच स्मृती मंधानाच्या खांद्यावर ट्रेलब्लेझर्स टीमची जबाबदारी असणार आहे. तर मिताली राज वेलोसिटी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. 2019 मध्ये हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवा संघाने मिताली राजच्या वेलोसिटी टीमचा अंतिम सामन्यात 4 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं.

ठिकाणाबाबत अनिश्चितता

दरम्यान हे सामने कोणत्या स्टेडियममध्ये खेळण्यात येतील, याबाबत कोणतीच माहिती बीसीसीआयने दिली नाहीये. यूएईत सध्या शारजा, दुबई आणि अबुधाबीतील स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेतील सामने खेळले जात आहेत. असे असले तरी, ही स्पर्धा शारजात खेळवण्यात येणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू 22 ऑक्टोबरला यूएईला रवाना होण्याची शक्यता आहे. त्यांनतर खेळाडूंना पुढील काही दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना सुपरनोवा विरुद्ध वेलोसिटी यांच्यात खेळण्यात येणार आहे. या टी 20 स्पर्धेच्या निमित्ताने कोरोनानंतर पहिल्यांदाच महिला क्रिकेटपटू मैदानात उतरणार आहेत.

असं आहे टी 20 स्पर्धेचं वेळपत्रक

पहिला सामना : सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी, 4 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

दुसरा सामना : वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, 5 नोव्हेंबर, दुपारी 3:30 वाजता

तिसरा सामना : ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज – 7 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

फायनल: 9 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

असे आहेत संघ

सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक

ट्रेलब्लेझर्स : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम

वेलोसिटी : मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ति , शैफाली वर्मा, सुषमा वर्मा (विकेटकीपर), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देव्या वैद्य, सुष्री दिब्यादर्शिनी, मनाली दक्षिणिणी, लीघ कास्पेरेक, डॅनियल व्यान लुस, जहाँआरा आलम आणि एम अनघा

संबंधित बातम्या :

नीतू डेव्हिड भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या राष्ट्रीय निवड समितीच्या प्रमुखपदी

(BCCI announces squads for Women’s T20 Challenge)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.