IPL 2020, SRH vs MI : ऋद्धीमान साहा-डेव्हिड वॉर्नरची धमाकेदार खेळी, मुंबईवर 10 विकेट्सने मात, हैदराबादची प्ले ऑफमध्ये धडक

हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहा या सलामीवीर जोडीने 151 धावांची नाबाद सलामी भागीदारी केली.

IPL 2020, SRH vs MI : ऋद्धीमान साहा-डेव्हिड वॉर्नरची धमाकेदार खेळी, मुंबईवर 10 विकेट्सने मात, हैदराबादची प्ले ऑफमध्ये धडक
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 11:25 PM

शारजा : सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह हैदराबादने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे विजय आव्हान एकही विकेट न गमावता 17.1 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. हैदराबादने 151 धावा केल्या. हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा या सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी केली. या दोघांनी नाबाद 151 धावांची सलामी भागीदारी केली.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत 10 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 85 धावा केल्या. तर ऋद्धीमान साहाने 45 चेंडूत 1 सिक्स आणि 7 फोरसह नाबाद 58 धावांची खेळी केली. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला एकही विकेट घेता आली नाही.

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक धावा केल्या. पोलार्डने 25 चेंडूत 2 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 41 धावा केल्या. मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. मुंबईकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने 25 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 36 रन्सची खेळी केली. तर इशान किशन 33 धावांवर बाद झाला. हिटमॅन रोहित शर्माने 4 सामन्यानंतर पुनरागमन केलं. मात्र त्याला विशेष काही करता आले नाही. रोहित 4 धावांवर माघारी परतला. कृणाल पांडयाला भोपळाही फोडता आला नाही. सौरभ तिवारी 1 धावेवर बाद झाला.

हैदराबादकडून संदीप शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डर-शहबाज नदीमने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रशिद खानने 1 विकेट मिळवला.

ipl 2020 srh vs mi live score update today cricket match sunrisers hyderabad vs mumbai indians लाईव्ह स्कोअरकार्ड

[svt-event title=”हैदराबादचा मुंबईवर 10 विकेट्सने शानदार विजय” date=”03/11/2020,11:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऋद्धीमान साहाचे अर्धशतक” date=”03/11/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वॉर्नरचे अर्धशतक” date=”03/11/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऋद्धीमान साहा-डेव्हिड वॉर्नरची शतकी भागीदारी” date=”03/11/2020,10:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद मजबूत स्थितीत” date=”03/11/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सलामी अर्धशतकी भागीदारी” date=”03/11/2020,9:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”3 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोअर” date=”03/11/2020,9:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”03/11/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान” date=”03/11/2020,9:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कायरन पोलार्ड आऊट” date=”03/11/2020,9:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला सातवा झटका” date=”03/11/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला सहावा झटका” date=”03/11/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”16 ओव्हरनंतर मुंबईची धावसंख्या” date=”03/11/2020,8:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पाचवा धक्का” date=”03/11/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला चौथा धक्का” date=”03/11/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला तिसरा धक्का ” date=”03/11/2020,8:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”8 ओव्हरनंतर मुंबई” date=”03/11/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”7 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”03/11/2020,8:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला दुसरा झटका” date=”03/11/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा 4 ओव्हरनंतर स्कोअर” date=”03/11/2020,7:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”03/11/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”03/11/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघ” date=”03/11/2020,7:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची प्लेइंग इलेव्हन टीम ” date=”03/11/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची टीम ” date=”03/11/2020,7:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादने टॉस जिंकला” date=”03/11/2020,7:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

हैदराबादसाठी हा सामना ‘करो या मरो’ चा असणार आहे. प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. मुंबईने आधीच प्ले ऑफ फेरी गाठली आहे. मुंबईच्या हार-जीत वर प्ले ऑफचा चौथा संघ ठरणार आहे. सध्या प्ले ऑफच्या 1 जागेसाठी हैदराबाद आणि कोलकाता या दोघांमध्ये शर्यत आहे.

यंदाच्या मोसमात हैदराबाद आणि मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी 4 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ समोरासमोर आले होते. या सामन्यात मुंबईने हैदराबादवर 34 धावांनी विजय मिळवला होता. हैदराबाद ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई 18 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड (कर्णधार), कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाईल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

सनरायजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, अभिषेक शर्मा, बी संदीप, संजय यादव, फेबियन एलेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.

संबंधित बातम्या :

IPL प्लेऑफचं गणित : मुंबईच्या विजयाकडे कोलकात्याचं लक्ष, हैदराबादसाठी ‘करो या मरो’ची स्थिती 

IPL 2020, MI vs SRH : मुंबई इंडियन्सची सनरायजर्स हैदराबादवर 34 धावांनी मात

ipl 2020 srh vs mi live score update today cricket match sunrisers hyderabad vs mumbai indians

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.