MS Dhoni Monk Look : धोनीने संन्यास घेतला? बौद्ध भिक्खूच्या अवतारातला फोटो व्हायरल

| Updated on: Mar 14, 2021 | 11:47 AM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) च्या 14 व्या सत्रासाठी सराव करीत आहे.

MS Dhoni Monk Look : धोनीने संन्यास घेतला? बौद्ध भिक्खूच्या अवतारातला फोटो व्हायरल
MahendraSingh Dhoni
Follow us on

चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) च्या 14 व्या सत्रासाठी सराव करीत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराचा नुकताच नेटमध्ये फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. परंतु आता धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (MS Dhoni New Monk Look Going Viral On Social Media)

धोनीच्या या नव्या फोटोमुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. कारण या फोटोमध्ये धोनी बौद्ध भिक्खूसारखा दिसत आहे. आयपीएल 2021 पूर्वी धोनीने सांसारिक मोह मायेपासून संन्यास घेतला आहे का? असा सवाल काहीजण उपस्थित करु लागले आहेत. तर धोनीच्या या नव्या लुकमुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस सुरु झाला आहे.

धोनीचा हा फोटो स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसतेय की धोनीने टक्कल केलं आहे आणि बौद्ध भिक्खूसारखे कपडे घालून तो जंगलात बसला आहे. सोशल मीडियावर धोनीचा हा फोटो पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. धोनीने संन्यास घेतला आहे का? असा सवा सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

जाहिरातीचा भाग?

या फोटोत असं दिसतंय की, धोनीने टक्कल केलं आहे. पण त्याने खरंच टक्कल केलंय की तसा मेकअप केला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. काहींचे मत आहे की, हा फोटो एखाद्या जाहीरातीचा भाग असू शकतो. दरम्यान, धोनी सध्या आयपीएल 2021 ची तयारी करत आहे आणि तो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधारही आहे. अलीकडेच धोनीचा सराव करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या जुन्या शैलीत फलंदाजी करताना दिसला. या व्हिडिओमध्ये माही नेटमध्ये फलंदाजी करीत होता. सुरुवातीला तो डाऊन द ग्राऊंड फटके मारताना दिसला, परंतु थोड्या वेळाने तो मोठे फटके मारू लागला, तसेच यावेळी त्याने अनेक गगनचुंबी षटकारही मारले.

10 एप्रिलला अ‍ॅक्शनमध्ये दिसणार

आयपीएल 2021 चा पहिला सामना 9 एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. चेन्नई सुपर किंग्ज 10 एप्रिलपासून दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात आपली मोहीम सुरू करणार आहे. त्यामुळे माही 10 एप्रिलला अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

आयपीएलच्या मागील सत्रात अपयशी

गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीसाठी आयपीएल 2020 स्पर्धा काही खास ठरली नव्हती. कोरोना साथीच्या काळात युएईमध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएल 13 मध्ये धोनीला 14 सामन्यात फक्त 200 धावा करता आल्या. यावेळी, त्याने एकही अर्धशतक ठोकले नाही. तसेच तो संपूर्ण हंगामात केवळ 116.27 च्या स्ट्राइक रेटने धावा जमवू शकला.

इतर बातम्या

Video : टायगर अभी जिंदा हैं… युवीचे एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार, पाहा डोळ्यांचं पारणं फेडणारा व्हिडीओ

देव कधी रिटायर होत नाही, सचिनचा धमाका, 30 चेंडूत तुफानी अर्धशतक!

India vs England 2nd T20I | पराभवानंतरही संघात बदल होणार नाही, आम्ही असेच खेळणार, स्टार खेळाडूची प्रतिक्रिया

(MS Dhoni New Monk Look Going Viral On Social Media)