AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देव कधी रिटायर होत नाही, सचिनचा धमाका, 30 चेंडूत तुफानी अर्धशतक!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात बॅटिंग करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

देव कधी रिटायर होत नाही, सचिनचा धमाका, 30 चेंडूत तुफानी अर्धशतक!
सचिन तेंडुलकर
| Updated on: Mar 14, 2021 | 9:39 AM
Share

मुंबई :  क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात बॅटिंग करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शनिवारी पार पडलेल्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजच्या (World Safety Series) इंडिया लिजेंड्स (india legends) विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजेंड्स (South Africa legends) यांच्यातील सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केवळ 30 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावलं. (Sachin tendulkar Hit Fifty in 30 Ball india legends Vs South Africa legends road Safety World Series)

सचिनची वेगवान 60 धावांची खेळी

सचिन तेंडुलकरने 37 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारांच्या सहाय्याने 60 रन्सची धमाकेदार खेळी केली. त्याचे अफलातून चौकार बघण्यासारखे होते. अगदी त्याने मारलेले फ्लिक, कव्हर ड्राईव्ह ‘सुप्पर से उप्पर’ होते. दुसऱ्या विकेटसाठी सचिन आणि एस. बद्रीनाथने 95 रन्सची पार्टनरशीप केली. दक्षिण आफ्रिकेच्या जोंडेकीने सचिनला आपलं शिकार बनवलं. तर 14 व्या ओव्हरमध्ये बद्रीनाथ 42 रन्सची खेळी करुन रिटायर्ड हर्ट झाला.

सचिनच्या खेळीचा सोशल मीडियावर फिव्हर

मास्टर ब्लास्टरने खेळलेल्या खेळीचा सोशल मीडियाला फिव्हर चढलाय. क्रिकेट रसिक आणि सचिनचे फॅन्स त्यांचं तोंडभरुन कौतुक करतायत. सचिनने पुन्हा एकदा जुन्या अंदाजात आक्रमक फलंदाजी केल्याने कॉमेंटेटरला देखील सचिनचं कौतुक करताना शब्द अपुरे पडले. देव कधीच रिटायर होत नसतो, इतक्या उच्च पराकोटीच्या शब्दात त्याने सचिनच्या यथार्थ खेळीचं सार्थ वर्णन केलं.

इंडिया लिजेंड्सचं 205 धावांचं लक्ष्य

नाणेफेक गमावल्यानंतरही इंडिया लिजेंड्सला प्रथम बॅटिंग करण्याची संधी मिळाली. याच संधीचं सोनं करत सचिनने आतिषी खेळी केली. त्याने घातलेल्या पायावर युवराज सिंहने कळस चढवला.

सचिनने घातला पाया, युवराजने चढवला कळस

सिक्सर किंग युवराजने देखील आपल्या आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. युवराजने तर केवळ 21 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने एकाच ओव्हरमध्ये त्याने चार षटकार खेचले. युवराजने 21 चेंडूत 2ृ52 धावा ठोकल्या. मनप्रीत गोनी आणि युवराज सिंगमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप झाली.

(Sachin tendulkar Hit Fifty in 30 Ball india legends Vs South Africa legends road Safety World Series)

हे ही वाचा :

Video : सेहवाग म्हणाला, ‘आमचा देव’, युवराज म्हणाला, ‘बब्बर शेर’, पाहा सचिन-सेहवागचा मजेशीर व्हिडीओ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.