AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सेहवाग म्हणाला, ‘आमचा देव’, युवराज म्हणाला, ‘बब्बर शेर’, पाहा सचिन-सेहवागचा मजेशीर व्हिडीओ

वीरेंद्र सेहवागने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सचिन तेंडुलकरसोबचा एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.

Video : सेहवाग म्हणाला, 'आमचा देव', युवराज म्हणाला, 'बब्बर शेर', पाहा सचिन-सेहवागचा मजेशीर व्हिडीओ
सचिन तेंडुलकर
| Updated on: Mar 09, 2021 | 1:31 PM
Share

मुंबई : सध्या भारतात रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजची (Road Safety World Series 2021) धूम सुरु आहे. या स्पर्धेत अनुभवी फलंदाज पुन्हा आपल्या खेळाचा नजारा सादर करत आहेत. भारताची एव्हरग्रीन सचिन सेहवागची (Sachin tendulkar And Virendra Sehwag) जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण त्यांचा खेळ तर आहेच पण आता त्यांचा मजेदार अंदाजातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Road Safety World Series Yuvraj Singh Sachin tendulkar And Virendra Sehwag Funny Video)

व्हिडीओत नेमकं काय घडलंय…?

एका खुर्चीवर सचिन तेंडुलकर बसलेला आहे. त्याच्या हाताला काहीतरी दुखापत झाल्याने त्याने सुई लावलेली आहे. हाच धागा पकडत वीरेंद्र सेहवागने सचिनची चेष्टा केलीय. अजूनही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरत नाही किंबहुना कंटाळा येत नाही. बघा आमचे देव…सुई लावून मॅच खेळणार… असं म्हणत त्याने सचिनला चिमटा काढला. दुसऱ्या क्षणी सेहवाग तिथे शेजारीच उपस्थित असणाऱ्या युवराज सिंगकडे जातो आणि त्याला विचारतो, तुझी प्रतिक्रिया काय? यावर युवराजने उत्तर दिलं.. “सेहवाग तू शेअर असशील पण सचिनपाजी बब्बर शेर आहे…” युवराजच्या उत्तरानंतर एकच हशा पिकला.

सचिन सेहवागला काय म्हणाला?

युवराजची प्रतिक्रिया घेतल्यानंतर सेहवागने आपला मोर्चा वेळवला तो सचिनकडे.. आपली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न सेहवागने सचिनला विचारला. त्यावर सचिननेही षटकार ठोकला. तुझ्यासमोर प्रतिक्रिया द्यायला कुणाला संधी मिळते काय तेव्हा?, असं सचिन म्हणाला. सचिनच्या उत्तरानंतर तिथे उपस्थित युवराज-सचिन-सेहवाग तिघेही लोटपोट हसतात.

पाहा  व्हिडीओ :

वीरुचा जलवा कायम, 15 चेंडूत 70 धावा चोपल्या

आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या अनेक वर्षांनतरही वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) जलवा कायम आहे. सेहवागने आपल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. सध्या भारतात इंडिया रोड सेफ्टी  वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धा (Road Safety World T20 Series) सुरु आहे. या स्पर्धेत 5 मार्चला बांगलादेश लिजेंड्स (Bangladesh Legends) विरुद्ध इंडिया लिजेंड्स India Legends यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंडियाने बांगलादेशवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात सेहवागने विजयी खेळी साकारली. सेहवागने एकूण 35 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. म्हणजेच सेहवागने 15 चेंडूत 70 धावा चोपल्या.

हे ही वाचा :

Video: सेहगाव सचिन जोडी पुन्हा मैदानात, वीरुनं पुन्हा ठोकलं, सिक्स मारुन फिफ्टी, पाहा तो व्हिडीओ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.