Video : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भर मैदानातच राडा, सरावादरम्यान कसलाही विचार न करता भिडले
आयपीएल 2024 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त एक औपचारिक सामना शिल्लक आहे. आत्मसन्मानासाठी हा सामना मुंबई इंडियन्स खेळणार आहे. गुणतालिकेतही मुंबई इंडियन्स संघ सर्वात शेवटी आहे. यावरूनच संघाची कागमिरी अधोरेखित होत आहे. असं असताना एक व्हिडीओ समोर आला आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा प्रवास फक्त एका सामन्यापुरता शिल्लक राहीला आहे. हा सामना 17 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सामना फक्त औपचारिक असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे चाहत्यांनी आपला सर्व राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. असं असताना मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सराव सामन्यादरम्यात विकेटकीपर फलंदाज इशान किशन आणि टिम डेविड यांच्यात कुस्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मुंबईचे दुसरे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करत होते. दुसरीकडे, इशान किशन आणि टिम डेविड यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. या दोघांमध्ये मजेशीर अंदाजात एक कुस्तीचा सामना झाला. या कुस्तीचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर टाकला आहे.
इशान किशनने 6 फूट 5 इंच लांबी असलेल्या टिम डेविडला धोबीपछाड देण्यासाठी सर्व डावपेच टाकले. टिम डेविडला मातीत लोळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले, पण तसं काही झालं नाही. टिम डेविड ताकदवान एथलीट आहे. त्याने पहिल्यांदा तर इशान किशनला घट्ट पकडीत घेतलं आणि जमिनीवर आडवा केला. इशान किशन आणि टिम डेविड ही कुस्ती मजेशीर अंदाजात खेळत होते. पण या मस्करीत दोघांपैकी एकाला इजा होऊ शकली असती. इतर खेळाडूंनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली.
Warning: These are trained professionals, don't try this at home 😂 #MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ishankishan51 | @timdavid8 pic.twitter.com/GcSsfOJ7Qh
— Mumbai Indians (@mipaltan) May 16, 2024
इशान किशनला टी20 वर्ल्डकप संघातून डावलण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना 17 मे रोजी झाल्यानंतर इशान किशनला आराम करावा लागणार आहे. दुसरीकडे टिम डेविडला ऑस्ट्रेलियन संघात निवडलं गेलं आहे. जर टिम डेविडला दुखापत झाली असती तर ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्डकपपूर्वी फटका बसला असता. पण सुदैवाने असं काही झालं नाही.
मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. मुंबई इंडियन्समध्ये दिग्गज खेळाडू असूनही स्थिती एकदमच वाईट असल्याचं पाहायला मिळालं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात या पर्वात मुंबई इंडियन्सला हवं तसं यश मिळालं नाही. आता पुढच्या पर्वात मुंबई इंडियन्स लिलावात कोणाला रिलीज करते आणि कोणाला संघात घेते याची उत्सुकता आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे.