AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनशिपसाठी एकटा रोहित शर्माचं नाही अजून तीन प्लेयर सुद्धा दावेदार, त्यांचा परफॉर्मन्सही दमदार

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनशिपवरुन हार्दिक पंड्याला हटवण्यात येणार आहे. कारण मागचे तीन सीजन त्याच्या नेतृत्वाखाली टीमने खराब प्रदर्शन केलं. आता कर्णधारपदासाठी रोहित शर्माच्या नावाची चर्चा आहे. पण या शर्यतीत एकटा रोहितच नाहीय अजून तीन प्लेयर सुद्धा आहेत.

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनशिपसाठी एकटा रोहित शर्माचं नाही अजून तीन प्लेयर सुद्धा दावेदार, त्यांचा परफॉर्मन्सही दमदार
Rohit Sharma Image Credit source: PTI
| Updated on: Oct 14, 2026 | 5:25 PM
Share

आयपीएल 2027 चा सीजन सुरु व्हायला अजून बराच वेळ बाकी आहे. पण मंगळवारी ‘स्पोर्ट्स तक’ने एक बातमी दिली. त्यानुसार हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात येणार आहे. कारण सलग तीन सीजन त्याने खराब कामगिरी केली आहे. त्याच्याजागी पुन्हा एकदा रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच कर्णधार बनवलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. रोहित शर्माची नियुक्ती झाली तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा त्याचा हा दुसरा कार्यकाळ असेल. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोपडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोपडा म्हणाले की, “मला माहित नाही की ही बातमी किती योग्य आहे, किती चूक. स्पोर्ट्स तकने ही बातमी दिली असेल तर त्यांनी फॅक्ट चेक नक्कीच केलं असेल”

“ही बातमी जरी खरी असली तरी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा लॉन्ग टर्म कॅप्टन नसेल. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून तो एकवर्ष सेवा देईल किंवा त्यापेक्षा थोडी जास्त. आकाश चोपडा यांनी आयपीएलच्या पुढच्या सीजन्ससाठी मुंबई इंडियन्सचे कॅप्टन म्हणून काही खेळाडूंची नावं घेतली. रोहित शर्मा शिवाय त्यांनी अजून तीन नावं सुद्धा घेतली. यात सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्माचं सुद्धा नाव होतं”

..तर फायदा होऊ शकतो

“मुंबई इंडियन्सने आपल्या कॅप्टनला नेहमी पुरेसा वेळ दिला आहे. फ्रेंचाजयी रोहित शर्मा पुढे विचार करत असेल तर सूर्यकुमार यादवला कॅप्टन म्हणून आपण पाहू शकतो. सूर्या टीम इंडियाच्या बाहेर आहे आणि तो दुसरीकडे क्रिकेट खेळत नाहीय असा सूर्याबद्दल तर्क दिला जाऊ शकतो. पण त्याने भारताला टी20 वर्ल्ड कप जिंकून दिलाय. त्याने पूर्ण फोकससह टीमला लीड केलं तर फायदा होऊ शकतो” असं आकाश चोपडाला वाटतं.

चार पर्याय सुचवले

त्यानंतर आकाश चोपडाने तिलक वर्माचं नाव घेतलं. तिलक वर्मा आधीपासून टीम इंडियाच्या टी20 टीमचा उपकर्णधार आहे. मुंबई त्याच्यामध्ये लॉन्ग टर्म कॅप्टनला पाहू शकते. आकाशने तिलक वर्माबद्दल भविष्यवाणी सुद्धा केली. आज नाही तर उद्या तिलक वर्मा कुठल्याना कुठल्या फ्रेंजायचीचा कॅप्टन नक्की बनेल. आकाश चोपडाने तिसरं नाव जसप्रीत बुमराहचं घेतलं. बुमराहच्या नेतृत्वाखाली सुद्धा भारताने मॅच जिंकल्या आहेत. जितक्या सामन्यात भारताचं नेतृत्व केलं, तितक्या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन केलं. त्याच्या वर्कलोडकडे दुर्लक्ष केलं तर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनण्यासाठी दावेदार आहे. आकाश चोपडाने आगामी आयपीएल सीजनसाठी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह हे कॅप्टनशिपसाठी चार पर्याय सुचवले आहेत.

Follow Us
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....