AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओजल नलवडीचे ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंगमध्ये 13 विक्रम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद

ओजल सुनील नलवडी (Ojal Nalavadi) या मुलीने ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंगमध्ये 400 मीटरचें अंतर कमी वेळात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. Ojal Nalavadi skating video shared by Gunniess World Records

ओजल नलवडीचे ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंगमध्ये 13 विक्रम,  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 01, 2020 | 3:26 PM
Share

बंगळुरू : कर्नाटकच्या ओजल सुनील नलवडी (Ojal Nalavadi) या मुलीने ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंगमध्ये 400 मीटरचें अंतर कमी वेळात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. ओजलच्या या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली आहे. केवळ 12 वर्ष वय असताना ओजलनं 13 विक्रम प्रस्थापित केले आहेत. ओजल नलवडीच्या विक्रमांची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्डससमध्ये आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालीय. ओजलच्या स्केटिंगचा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने शेअर केला आहे. (Ojal Nalavadi skating video shared by Gunniess World Records )

कर्नाटकमधील हुबळी शहरातील ओजल नलवडीला रोलर स्केटिंग की ट्रेनिंग कोच अक्षय सुर्यवंशी यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये भाग घेण्यापूर्वी ओजलने 2 वर्ष शिरुर पार्कमध्ये सराव केला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ओजल नलवडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ओजल नलवडी हिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने 400 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा कालावधी दिला होता. ओजलने हे अंतर 51.25 सेंकदात पूर्ण केले.

ओजल सुनील नलवडी चा व्हिडीओ guinnessworldrecords ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज पर 28 ऑक्टोबरला शेअर केला आहे. ” सर्वात वेगवान ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंग करणाऱ्या मुलीने 400 मीटरचं अंतर फक्त 51.25 सेकंदात पूर्ण केले”, असं कॅप्शन लिहलं आहे.ओजलच्या या व्हिडीओला 28 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ओजलच्या कामगिरीबद्दल अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

Fastest 400 m on roller skates blindfolded (female) ⏱️ 51.25 sec by Ojal Sunil Nalavadi ?? #gwrday #rollerskating

A post shared by Guinness World Records (@guinnessworldrecords) on

दरम्यान, ओजलने हा विक्रमा मागली वर्षी बालदिनाच्या दिवशी केला होता. ती हुबळी शहरात शिक्षण घेत आहे. ओजलची कामगिरी पाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित राहिले होते.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs KXIP Live : चेन्नई सुपर किंग्जसचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय

IPL 2020 : रोहित शर्माच्या कमबॅकबाबत कायरन पोलार्डचं मोठं वक्तव्य

(Ojal Nalavadi skating video shared by Gunniess World Records )

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ