IPL 2020 : रोहित शर्माच्या कमबॅकबाबत कायरन पोलार्डचं मोठं वक्तव्य

भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यांपासून दूर आहे.

IPL 2020 : रोहित शर्माच्या कमबॅकबाबत कायरन पोलार्डचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 12:49 PM

दुबई : भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने (Hamstring Strain) सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यांपासून दूर आहे. तसेच या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) जाहीर झालेल्या तिन्ही संघातून वगळण्यात आले आहे. विराट कोहली कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने आयपीएलमधील मागील चार सामने खेळलेला नाही. रोहीतच्या अनुपस्थितीत मुंबई इडियन्सचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड सध्या संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितच्या अनुपस्थितीतही संघ चांगल्या स्थितीत असून मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. तरिही रोहित कधी कमबॅक करणार असा प्रश्न त्याच्या आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या मनात आहे. याबाबत संघाचा सध्याचा कर्णधार कायरन पोलार्डने मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहितच्या कमबॅकबाबत पोलार्ड म्हणाला की, रोहित त्याच्या दुखापतीमधून सावरतोय, लवकरच तो संघात कमबॅक करेल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर पोलार्ड समलोचकांशी बोलत होता. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहितच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले गेले होते. त्यातूनत रोहित आता सावरतोय.

मुंबई इंडियन्समधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याद्वारे संघात पुनरागमन करण्याची तयारी करत होता. परंतु त्यापूर्वीच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तसेच आयपीएलमध्ये उरलेल्या सर्व सामन्यांचे निकाल कसेही लागले तरी मुंबई इंडियन्स हा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईच्या संघासाठी हैदराबादविरुद्धचा सामना फार महत्त्वाचा नाही. त्यामुळे रोहित या सामन्यादरम्यानही आराम करेल. त्यानंतर रोहित थेट क्वालिफायर सामन्यात संघात पुनरागमन करु शकतो.

रोहितवरील उपचार आणि त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून असलेल्या एका सुत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले की, रोहित प्ले ऑफमधील सामने खेळण्याची अधिक शक्यता आहे. संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम राहणार असल्याने रोहितला दुखापतीमधून सावरण्यासाठी आणि फिट होण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

संबंधित बातम्या

IPL 2020, DC vs MI : इशान किशनची शानदार खेळी, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

IPL 2020 | “त्याने चेन्नईसाठी सर्व काही दिलं”, गौतम गंभीरकडून धोनीचं कौतुक

आमच्या देशाकडून खेळणार का?, तडाखेबाज खेळीनंतर मुंबईच्या सूर्यकुमार यादवला ऑफर

IPL 2020, MI vs RCB : सामना एक, किस्से अनेक – सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न, हार्दिक-मॉरिसचं शाब्दिक युद्ध, रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार

(IPL 2020 : Kieron Pollard made a big statement on Rohit Sharmas comeback in Mumbai Indians Team)

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.