India Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू द्या, सुनील गावसकर कडाडले

आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

India Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू द्या, सुनील गावसकर कडाडले

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची 26 ऑक्टोबरला (India Tour Australia) घोषणा करण्यात आली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि हिटमॅन असलेला रोहित शर्माला (Hitman Rohit Sharma) या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. रोहित दुखापतग्रस्त असल्याने त्याची निवड न केल्याचे सांगितले जात आहे. रोहित आणि इशांत शर्माच्या (Ishant Sharma) दुखापतीवर बीसीसीआयचे (BCCI) वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे बीसीसीआयने ट्विटद्वारे कळवले आहे. यानंतर मुंबई इंडियन्सच्या ट्विटवरुन रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करत असल्याचे फोटो शेअर करण्यात आले. या फोटोनंतर क्रिकेट विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं. जर रोहित नेट्समध्ये सराव करतोय, तर त्याला अशी कोणती दुखापत झालीये, ज्यामुळे तो खेळू शकत नाही, अशा चर्चांना सुरुवात झाली. दरम्यान लिटिल मास्टर सुनील गावसकर (Little Master Sunil Gavaskar) रोहितची निवड न केल्याने संतापले आहेत. तसेच रोहितची निवड न झाल्याने चकित आहेत. Let The Fans Know Exactly What Happened To Rohit Sharma Sunil Gavaskar said

गावसकर काय म्हणाले?

“रोहित चांगल्या प्रकारे नेट्समध्ये सराव करतोय. रोहितला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असती, तर तो नेट्समध्ये सराव करताना दिसला नसता. रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड का केली नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. रोहितला नक्की काय झालंय, कोणत्या प्रकारची दुखापत झालीये, ज्यामुळे तो खेळू शकत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर निवड समितीने समर्थकांना द्यायला हवीत”, असं गावसकर म्हणाले. ते स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलत होते.

“निवड समितीला रोहितच्या दुखापती बद्दल पूर्ण माहिती नव्हती. किंवा त्याबद्दल निवड समितीचा रोहितशी योग्य तो संवाद झाला नसेल. मुंबई इंडियन्सने शेअर केलेले फोटो पाहून मी हैराण झालो. जर रोहित नेट्समध्ये खेळतोय, तर रोहितला अशी कोणती दुखापत झाली, हे मला समजत नाहीये. ऑस्ट्रेलियावर मानसिकरित्या दबाव आणण्यासाठी हे फोटो शेअर केले असावेत. रोहितला काय झालंय हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क क्रिकेट चाहत्यांना आहे”, असंही गावसकर म्हणाले.

रोहित दुखापतग्रस्त

काही दिवसांपूर्वी त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे रोहित शर्मा लागोपाठ दोन सामन्यांमध्ये खेळलेला नाही. अशातच आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने रोहित शर्माला वगळल्यामुळे त्याची ही दुखापत गंभीर असल्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आयपीएलच्या उर्वरित मोसमातूनही माघार घेईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. याचा मोठा फटका मुंबई इंडियन्स संघाला बसू शकतो. मात्र, याबद्दल अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

Let The Fans Know Exactly What Happened To Rohit Sharma Sunil Gavaskar said

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI