India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

के एल राहुलकडे वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे, टेस्ट आणि टी 20 मालिका खेळणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. या युवा खेळाडूंमध्ये शुभमन गिल, वरुण चक्रवर्थी आणि नवदीप सैनी खेळाडूंना संधी मिळाली आहे. Opportunity From Team India For A Tour Of Australia To Young Players Who Have Excelled In The IPL 2020

शुभमन गिल (Shubman Gill )

फलंदाज शुभमन गिल आयपीएलच्या 13 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतोय. गिलने यंदाच्या मोसमात 12 सामन्यात 378 धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर शुभमनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी आणि वनडे संघात स्थान दिले आहे.

वरुण चक्रवर्थी (Varun Chakravarthy) 

वरुण चक्रवर्थी या लेग स्पीनरने या मोसमात कोलकाताकडून 11 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणने नुकतेच आपल्या फिरकीच्या जाळ्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना अडकवले होते. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 20 धावा देत 5 विकेट्स झटकल्या होत्या. वरुण चक्रवर्थीला टीम इंडियाकडून टी 20 टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.

नवदीप सैनी (Navdeep Saini) 

नवदीप यंदाच्या आयपीएलच्या मोसमात बंगळुरुकडून खेळतोय. सैनी वेगवान गोलंदाज आहे. 11 सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या आहेत. विकेट्स कमी घेतले असले तरी सैनी फलंदाजांना आपल्या बोलिंगवर मोठे फटके मारु देत नाहीये. सैनीला टी 20, वनडे आणि कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

के एल राहुलला पदोन्नती (K. L. Rahul) 

आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाने दमदार कमबॅक केलं. पंजाबचा कर्णधार आणि सलामीवीर के एल राहुल सातत्याने चांगली कामगिरी करतोय. या कामगिरीची दखल बीसीसीआयने घेतली आहे. यानुसार बीसीसीआयने के एलच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. लोकेशच्या खांद्यावर वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. के एल राहुल ताज्या आकडेवारीनुसार आयपीएलच्या 13 व्या मोसमातील ऑरेंज कॅप होल्डर आहे.

सूर्यकुमार यादवला डच्चू (Suryakumar Yadav) 

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव आयपीएलच्या या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र सूर्यकुमारच्या पदरी निराशा पडली आहे.

रोहित शर्मा दुखापतग्रस्त (Rohit Sharma)

मुंबइ इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. यामुळे रोहित मागील 2 सामन्यात खेळला नाही. त्यामुळे रोहितऐवजी कायरन पोलार्डने मुंबईचे नेतृत्व केलं. मात्र आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही रोहितची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले जात आहे.

संबंधित बातम्या

IPL 2020 | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अडचणीत, ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

Opportunity From Team India For A Tour Of Australia To Young Players Who Have Excelled In The IPL 2020

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI