AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अडचणीत, ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2020 | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अडचणीत, 'हा' प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 26, 2020 | 7:49 PM
Share

दुबई : चेन्नई सुपर किंग्जसने रविवारी (25 ऑक्टोबर) डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात बंगळुरुचा 8 विकेट्सने पराभव केला. बंगळुरुला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी एका विजयाची गरज होती. मात्र ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरुचा पराभव झाला. या सामन्यादरम्यान बंगळुरुला एक झटका बसला. बंगळुरुचा स्टार गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे बंगळुरुच्या चिंतेत भर पडली आहे. IPL 2020 RCB Navdeep Saini Injured His Right Thumb Uncertainty About Playing In Next Match

बंगळुरुचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या बोटाला चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील 18 व्या ओव्हरमध्ये दुखापत झाली. सैनीच्या उजव्या हाताच्या अंगठ्या आणि बोटामधील त्वचा फाटली. त्यामुळे सैनीला मैदान सोडून जावे लागले. इजा झालेल्या ठिकाणी बंगळुरुचे फिजीओ इवान स्पीचलीने टाके मारले. बंगळुरु आगामी सामना  28 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. यासामन्यात सैनी खेळणार की नाही, हे निश्चित नाही. त्यामुळे बंगळुरुच्या चिंतेत भर पडली आहे.

“2016 साली अशाच प्रकारे विराट कोहलीला दुखापत झाली होती”, अशी माहिती फिजीओ स्पीचलीने दिली. “तेव्हा विराटच्या हाताला एकूण 9 टाके पडले होते. मात्र यानंतर विराट मैदानात उतरला होता. विराट-सैनीच्या दुखापतीची तुलना करणं योग्य नाही”, असंही यावेळी स्पीचलीने नमूद केलं.

नवदीप सैनीची आयपीएल कारकिर्द

नवदीपने यंदाच्या मोसमात 11 सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या आहेत. विकेट्स कमी घेतले असले तरी सैनी फलंदाजांना आपल्या बोलिंगवर मोठे फटके मारु देत नाहीये. दरम्यान मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी सैनीची दुखापत ठीक झाली नाही, तर त्याजागी उमेश यादव आणि शाहबाज अहमदला संधी मिळू शकते.

बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरु यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत. यापैकी 7 सामन्यात बंगळुचा विजय झाला आहे. तर 4 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.

संबंधित बातम्या :

Ben Stokes | आयपीएलमधील दुसरी नाबाद शतकी खेळी, बेन स्टोक्सचा पराक्रम, ठरला एकमेव खेळाडू

IPL 2020 RCB Navdeep Saini Injured His Right Thumb Uncertainty About Playing In Next Match

Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार