AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या तिन्ही संघातून वगळण्यात आले आहे.

IPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता
| Updated on: Oct 27, 2020 | 11:09 AM
Share

मुंबई : भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) जाहीर झालेल्या तिन्ही संघातून वगळण्यात आले आहे. विराट कोहली कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने (hamstring strain) रोहित आयपीएलमधील मागील दोन सामने खेळला नव्हता. हिटमॅन लवकरच मैदानावर परतेल, असे सर्वजण सांगत होते. परंतु रोहितची नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकांसाठी संघात निवड न झाल्याने रोहितच्या दुखापतीबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. परंतु या चर्चा आता थांबणार आहेत. (IPL 2020 : Hitman is back on ground, Rohit Sharma likely to be selected for Australia tour)

रोहित शर्मा काल रात्री सरावासाठी मैदानात उतरला होता. त्याने बराच वेळ मैदानात सराव केला. यादरम्यान रोहितने जोरदार फटकेबाजी केली. रोहितचे सरावादरम्यानचे फोटो मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल्सवरुन शेअर करण्यात आले आहेत. तसेच त्याचा एक व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला आहे. यावरुन स्पष्ट होते की, रोहित त्याच्या दुखापतीमधून रिकव्हर होत आहे. लवकरच तो आयपीएलच्या मैदानावर परतेल.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयचं वैद्यकीय पथक दुखापतीमधून सावरत असलेल्या रोहित शर्मावर लक्ष ठेवून आहे, त्याच्या सरावाकडेही बीसीसीआयचं लक्ष आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेली नसली तरी आम्ही त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत आहोत. रोहित 3 नोव्हेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. यादरम्यान त्याची फिटनेस टेस्ट होईल. त्यानंतर निवड समितीमधील अधिकारी रोहितची पुन्हा संघात निवड करायची की नाही, यावर निर्णय घेतील.

दरम्यान मुंबई इंडियन्सने म्हटले आहे की, आमचा कर्णधार दुखापतीमधून सावरतोय, लवकरच तो मैदानावर दिसेल. रोहितचा सहकारी क्विंटन डिकॉक याबाबत म्हणाला की, रोहित मैदानावर उतरण्यासाठी सज्ज होत आहे. आगामी सामन्यांमध्ये तो मैदानावर आमच्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल.

मुंबईचे आयपीएलमधील अद्याप तीन सामने बाकी आहेत. त्यानंतर प्ले ऑफ सामने होणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला अजून एक सामना जिंकणे आवश्यक आहे. संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. संघाची सध्याची परिस्थिती पाहता संघ प्ले ऑफमध्ये दाखल होईल. त्यामुळे प्लेऑफपूर्वी रोहितला मैदानावर उतरवलं जाण्याची अधिक शक्यता आहे. हिटमॅन 31 ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अथवा 3 नोव्हेंबर रोजी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानावर उतरु शकतो.

संबंधित बातम्या

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

ऋषभ पंतच्या लठ्ठपणाबाबत राहुल द्रविडचं BCCI ला पत्र, इशांत शर्माच्या फिटनेसबाबतही चिंता

(IPL 2020 : Hitman is back on ground, Rohit Sharma likely to be selected for Australia tour)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.