ऋषभ पंतच्या लठ्ठपणाबाबत राहुल द्रविडचं BCCI ला पत्र, इशांत शर्माच्या फिटनेसबाबतही चिंता

यूएईमध्ये सुरु असलेली आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

ऋषभ पंतच्या लठ्ठपणाबाबत राहुल द्रविडचं BCCI ला पत्र, इशांत शर्माच्या फिटनेसबाबतही चिंता

नवी दिल्ली : यूएईमध्ये सुरु असलेली आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. तत्पूर्वी टीम इंडिया खेळाडूंच्या दुखापतींमुळे चिंतेत आहे.

भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) दोघेही दुखापतग्रस्त असून आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. आता विकेटकिपर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) भारतीय संघातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एनसीए ने बीसीसीआयला निर्णय घेण्यास सांगितले

माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (National Cricket Academy) बीसीसीआयला (BCCI) ऋषभ पंत आणि इशांत शर्माबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एनसीएने याबाबत बीसीसीआयला पत्रदेखील लिहिले आहे.

या पत्रात इशांत शर्माच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे. तसेच ऋषभ पंतच्या लठ्ठपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रात म्हटलं आहे की, न्यूझीलंड दौऱ्यावर जे झालं ते आपण विसरुन चालणार नाही. आपण पुन्हा एकदा अशी जोखीम घेणार आहोत का? याबाबत बीसीसीआयने निर्णय घ्यावा.

पंतच्या निवडीचं काम निवड समितीवर

ऋषभ पंतचं वजन गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे. हा टीमसाठी चिंतेचा विषय बनू शकतो. फिटनेसच्या बाबतीत ऋषभ पंत इतर खेळाडूंपेक्षा खूप मागे आहे. त्यामुळे त्याची संघात निवड करायची की नाही, ही गोष्ट निवड समितीवर सोपवली आहे.

दरम्यान, कोव्हिड-19 चे सर्व प्रोटोकॉल भारतीय संघाला पाळावे लागणार आहेत. त्यामुळे एका संघाची निवड करुन त्यांना ऑस्ट्रिलियाला पाठवल्यानंतर निवड समितीसमोर दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे खूप विचार करुन खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला इशांत शर्माच्या फिटनेसबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने तो आयपीएल स्पर्धेबाहेर आहे. त्याला ठिक होण्यासाठी किमान 18 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एनसीएने पत्रात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी इशांतने किमान 3 ते 4 सराव सामने खेळणे आवश्यक आहे.

भारतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 डिसेंबर – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 डिसेंबर – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; पाहा संपूर्ण शेड्यूल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, पाचवा जलदगती गोलंदाज ठरतोय डोकेदुखी

(NCA asks BCCI to take a call on Rishabh Pant and Ishant sharma ahead of India tour of Australia)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *