टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; पाहा संपूर्ण शेड्यूल

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; पाहा संपूर्ण शेड्यूल
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 4:26 PM

मुंबई : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा (India Tour of Australia) नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. टीम इंडियाचा हा दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. उभय संघांमध्ये सुरुवातीला एकदिवसीय मालिका, नंतर टी-20 मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. (IND vs AUS | schedule of India tour-of Australia release)

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार 27 आणि 29 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे दोन एकदिवसीय सामने खेळवले जातील. त्यानंतर तिसरा एकदिवसीय सामना आणि टी-20 मालिकेतील पहिला सामना मानुका ओव्हल म्हणजेच कॅनबरा येथे खेळवला जाईल. शेवटचे दोन टी-20 सामने पुन्हा सिडनी येथे खेळवले जातील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्सच्या सरकारमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंना क्वारन्टाईन करणे आणि त्यांना ट्रेनिंगच्या सर्व सुविधा पुरवण्याबाबतचा करार झाला आहे.

अॅडलेड येथून कसोटी मालिकेस प्रारंभ

उभय संघांमधील कसोटी मालिका पिंक बॉलद्वारे खेळवली जाणार आहे. म्हणजेच हे सामने डे-नाईट असतील. 17 ते 21 डिसेंबरदरम्यान अॅडलेड येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. अॅडलेडचं मैदान हे बॉक्सिंग डे टेस्टचे बॅकअप व्हेन्यू असेल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मेलबर्नच्या मैदानावर यंदा कसोटी सामना खेळवण्यात अडचणी येतील यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅकअप तयार ठेवला आहे. या मालिकेतील तिसरा सामना 7 ते 11 जानेवारी 2021 या कालावधीत सिडनी येथे खेलवला जाईल, तर मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 15 ते 19 जानेवारी 2021 यादरम्यान ब्रिस्बेन येथे खेलवला जाईल.

भारतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 डिसेंबर – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 डिसेंबर – ब्रिस्बेन

टीम इंडियाचा पाचवा जलदगती गोलंदाज कोण?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. परंतु कसोटी मालिकेत भारताचा पाचवा जलदगती गोलंदाज कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मालिकांसाठी सिलेक्शन कमिटीचे चेअरमन सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या आठवड्यात बैठक होईल. या बैठकीत संघातील खेळाडूंची निवड होईल. पाचवा जलदगती गोलंदाज निवडणे हे या कमिटीसमोरचे मुख्य आव्हान असेल.

टीम इंडियाचे दोन प्रमुख जलदगती गोलंदाज जखमी झाल्यामुळे कसोटी मालिकेतील पाचव्या गोलंदाजाचा मुद्दा जास्त महत्त्वाचा बनला आहे. भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा हे दोघेही सुरु असलेल्या आयपीएलदरम्यान जखमी झाले आहेत. भुवीला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली आहे तर इशांतला स्टाईड स्ट्रेन.

सध्याच्या परिस्थितीत भारताकडे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव हे तीन मुख्य पेसर्स (जलदगती गोलंदाज) आहेत. नवदीप सैनी भारताचा चौथा जलदगती गोलंदाज असेल. पाचव्या गोलंदाजाची निवड करणे समितीसाठी अवघड जाणार आहे.

पाचव्या जलदगती गोलंदाजाची जागा मिळवण्यासाठी हैदराबादचा मोहम्मद सिराज आणि मुंबईचा शार्दुल ठाकूर हे दोघे रेसमध्ये आहेत. सिराजने इंडिया ए आणि रणजी ट्रॉफीच्या मोठ्या फॉरमॅटमधील सामन्यांमंध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला शार्दुलकडे नवा चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.

संबंधित बातम्या

IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुच्या एबी डीव्हीलियर्सची भन्नाट ‘शतकी’ कामगिरी

IPL 2020, KKR vs RCB : मोहम्मद सिराजची धडाकेबाज कामगिरी, ठरला पहिलाच गोलंदाज

IPL 2020 : 41 वर्षीय गेलचा मोठा विक्रम, कोणत्याही फलंदाजाला जमणार नाही अशी कामगिरी

(IND vs AUS | schedule of India tour-of Australia release)

Non Stop LIVE Update
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.