AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : 41 वर्षीय गेलचा मोठा विक्रम, कोणत्याही फलंदाजाला जमणार नाही अशी कामगिरी

ख्रिस गेल हे नाव नुसतं ऐकलं तरी आपल्याला मोठे-मोठे षटकार दिसू लागतात. आयपीएल 2020 मध्येदेखील गेल नावाचं वादळ दिसू लागलं आहे.

IPL 2020 : 41 वर्षीय गेलचा मोठा विक्रम, कोणत्याही फलंदाजाला जमणार नाही अशी कामगिरी
| Updated on: Oct 21, 2020 | 7:14 PM
Share

दुबई : ख्रिस गेल (Chris Gayle) हे नाव नुसतं ऐकलं तरी आपल्याला मोठे-मोठे षटकार दिसू लागतात. आयपीएल 2020 (IPL 2020) मध्येदेखील गेल नावाचं वादळ दिसू लागलं आहे. किंग्स इलेवन पंजाब (Kings XI Punjab) संघात गेलला सुरुवातीला संधी मिळाली नव्हती. परंतु मागील तीन साम्यांमध्ये त्याला संधी मिळाल्यानंतर त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. (IPL 2020 : Chris Gayle scored over 25 runs in an over for 7 times in IPL)

19 ऑक्टोबर रोजी पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात गेल लवकर बाद झाला, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला. गेल मैदानात उतरल्यापासून दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. गेलने 13 चेंडूत 29 धावांची खेळी केली. रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. परंतु बाद होण्यापूर्वी त्याने त्याची जबाबदारी नीट निभावली.

गेलने तुषार देशपांडेच्या एकाच षटकात तब्बल 26 धावा फटकावल्या. तुषारला त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. यासोबतच गेलने आयपीएलच्या इतिहासात तब्बल सात वेळा एकाच षटकात 25 किंवा त्याहून अधिक धावा फटकवण्याचा विक्रम रचला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड त्याच्याच नावावर होता. परंतु आता त्याने त्यावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने दोनपेक्षा अधिक वेळा एकाच षटकात 25 किंवा त्याहून अधिक धावा फटकावलेल्या नाहीत.

गेलनंतर चार फलंदाज

सर्वांना प्रश्न पडला असेल की या विक्रमाच्या बाबतीत गेलनंतर कोणाचा नंबर लागत असेल. याचं उत्तर आहे शेन वॉटसन, कायरन पोलार्ड, जोस बटलर और रोहित शर्मा. या चार फलंदाजांनी दोन वेळा एकाच षटकात 25 किंवा त्याहून अधिक धावा फटकावल्या आहेत. आंद्रे रसेल आणि एबी डिविलियर्ससारख्या दिग्गजांनी अशी कामगिरी केवळ एकदाच केली आहे.

एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा रेकॉर्डही गेलच्याच नावावर

आयपीएलमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा रेकॉर्ड गेलच्याच नावावर आहे. त्याने आयपीएल 2011 मध्ये कोची टस्कर्स केरला संघाचा गोलंदाज प्रशांत परमेश्वरनच्या गोलंदाजीवर एकाच षटकात 37 धावा फटकावल्या होत्या.

संबंधित बातम्या

OMG लग्नातही आवरला नाही क्रिकेटचा मोह, नवरीबाई साडी नेसून क्रिकेटच्या मैदानावर पोहोचल्या अन्….

IPL 2020, KXIP vs DC | किंमत 10.75 कोटी, 10 सामन्यात केवळ 90 धावा, तरीही कर्णधाराकडून कौतुक

IPL 2020 | DCvKXIP : शिखर धवनकडून विक्रमांचा पाऊस

(IPL 2020 : Chris Gayle scored over 25 runs in an over for 7 times in IPL)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.